लांजा-खोरनिनको धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

लांजा-खोरनिनको धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

Published on

rat7p30.jpg
76027
लांजाः खोरनिनको धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे बाहेर पडणाऱ्या पाण्याचे दृश्य विलोभनीय दिसते.
--------

खोरनिनको धबधबा पर्यटकांचे आकर्षण
लांजा तालुका; मुचकुंद नदीचे उगमस्थानी वाढती गर्दी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ८ ः पावसाळ्यात ओलेचिंब भिजून वर्षासहलीचा आनंद घ्यायचा असेल तर आता दूर जाण्याची गरज नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सर्वात मोठा आणि सर्वाधिक पसंती असलेला खोरनिनकोचा धबधबा पर्यटकांना साद घालत आहे. पावसाळ्यात धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर या मानवनिर्मित धबधब्याद्वारे तो बाहेर पडतो. त्यामुळे पावसाळ्यात खोरनिनको धबधबा खळखळून वाहून पर्यटकांना मनसोक्त वर्षासहलीचा आनंद देतो. मुचकुंदी नदीचे उगमस्थान असणाऱ्या ठिकाणी उभारलेले मुचकुंदी धरणप्रकल्प आणि त्यावरील धबधबा पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे.

चौकट
आनंद घेताना सावध राहा
खोरनिनको धरणाचे पात्र सखोल असून, धबधबा क्षेत्रात दगड, कातळभाग तर जास्त प्रमाणत पाऊस पडल्यास धबधब्याच्या पाणीप्रवाहात वाढ होते. बाजूने संरक्षक भिंत नसल्याने अतिउत्साह धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे खोरनिनको धबधब्यावर पावसाळ्यात वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com