रत्नागिरी ः जगन्नाथ महाराज यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
rat7p4.jpg
75953
लांजाः येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री पौलस्तेश्वर मंदिरात झालेल्या अभंगवाणी कार्यक्रमात गायन करताना जगन्नाथ महाराज गोसावी.
----------
जगन्नाथ महाराज यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
लांजा येथील संस्कृती फाउंडेशनतर्फे उपक्रम; आषाढीवारीचे बारावे वर्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः संस्कृती फाउंडेशन लांजा-रत्नागिरीतर्फे आषाढीवारी म्हणजेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने लांजा शहरातील पौलस्तेश्वर मंदिरात सुप्रसिद्ध कीर्तनकार-प्रवचनकार जगन्नाथ महाराज गोसावी यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम उत्साहात झाला. आषाढीवारीच्या निमित्ताने घेतलेल्या रूप पाहता लोचनी या अभंगावाणी कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला जगन्नाथ महाराजांचे संस्कृती फाउंडेशनच्यावतीने यथोचित स्वागत करण्यात आले. राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, देहुडा चरणी वाजवितो वेणू, ज्ञानेश्वर माऊली गजर, अभंग गवळण अशा पद्धतीने जगन्नाथ महाराजांनी आपल्या मधूर वाणीने अभंग गायनासह ज्ञानेश्वरी व संतांचे दाखले देत लांजा शहरातील विठ्ठलभक्तांना पंढरपूर वारीचे खऱ्या अर्थाने दर्शन घडवले. कार्यक्रमाची सांगता संतकृपा झाली या भैरवीने झाली. भैरवी गायनामध्ये जगन्नाथ महाराजांसह बुवा नितीन शेट्ये, राजेश गोसावी, श्रीकांत बोंबले, नितीन गोडबोले यांनी देखील सहभाग घेतला. विठू माऊलीच्या गजरात प्रत्येक रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा ठेका धरला.
या दरम्यान आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांनी विठूचा गजर हरिनामाचा या गजरावर नृत्यसह ठेका धरला. विठ्ठल रूक्मिणी यांच्या वेशभूषासह आलेले भगवती शिशूविहारचे छोटे विद्यार्थी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या कार्यक्रमासाठी जगन्नाथ महाराजांसोबत सहगायक म्हणून राजेश गोसावी, नितीन गोडबोले, श्रीकांत बोंबले, अभय पाध्ये यांनी उत्तम भूमिका बजावली.
कार्यक्रमाला हार्मोनियम साथ आकाश लेले, तबलासाथ शुभम लिंगायत, पखवाज किसन गोसावी व तालवाद्य राजेश गोसावी व नितीन गोसावी यांनी सांभाळले तर निवेदनाची उत्तम भूमिका प्रसिद्ध निवेदक योगेश शेट्ये यांनी उत्तमरित्या पार पडली. ध्वनीव्यवस्था दीपराज खाके यांनी सांभाळली. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात संस्कृती फाउंडेशनच्या सोबत विद्यार्थ्यांना लाखो रुपयाचे शैक्षणिक साहित्य वाटप करणाऱ्या ओंकार आचरेकर व प्राजक्ता आचरेकर या दोघांचा संस्कृती फाउंडेशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.