गिरणी कामगारांच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
गिरणी कामगारांच्या मोर्चात
सहभागी होण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः मुंबईतच हक्काचे मोफत घर मिळावे, यासाठी गिरणी कामगार आणि वारसदारांचा बुधवारी (ता.९) भायखळा (मुंबई) येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान ते विधान भवन या दरम्यान लाँग मार्च काढणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गिरणी कामगार व वारस यांनी या निर्णायक आंदोलनात सहभागी व्हावे, असे सर्व श्रमिक संघटनेचे कॉ. बी. के. आंब्रे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक प्रमुख शांताराम परब यांनी आवाहन केले आहे.
आंदोलना संदर्भातील इत्यंभूत माहितीचे निवेदन २५ ला झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने सरकारला देण्यात आले आहे. याला सर्वच कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या या आंदोलनात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व इतर पक्षांचे आमदार मोर्चाला पाठिंबा देऊन उपस्थित राहणार आहेत.