फ्रेंड सर्कलच्या अध्यक्षपदी मोरे
‘फ्रेंड सर्कल’चा
अध्यक्षपदी मोरे
गुहागर : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रेंड सर्कल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सागर मोरे यांची निवड झाली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अनिकेत भोसले, प्रमुख कार्यवाहक रोहन विखारे, खजिनदारपदी प्रीतम वराडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून जयदेव मोरे, समीर पेंढारी, अमित भोसले, विष्णू होलंब, सुयोग आरेकर, अनराज वराडकर, विक्रांत आरेकर, सुरज वराडकर, केतन गोयथले, सल्लागार म्हणून सुहास सुर्वे, प्रशांत मोरे, समीर आरेकर, संतोष आरेकर, नंदकुमार वराडकर, नीलेश लोखंडे, महेंद्र वराडकर, संतोष मोरे, अजय वराडकर, समीर मोरे तर कायदेशीर सल्लागार अॅड. मयुरेश पावसकर यांची निवड केली आहे.
‘एक्सलंट अॅकॅडमीत’
विठ्ठलाचा गजर
गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अॅकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छोट्या वारकरी विद्यार्थ्यांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात, टाळमृदंगाच्या नादात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली. या वेळी विठ्ठल विठ्ठल हाच जयघोष दुमदुमला आणि आबलोली गावाला साक्षात पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांचे दर्शन झाले. ही दिंडी पाहताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या दिंडीत शौर्य राठोड याने विठ्ठलाची आणि हर्षिता रहाटे हिने रखुमाईची हुबेहूब वेशभूषा केली होती. या वेळी विठ्ठल रखुमाईची पालखीही नाचवण्यात आली. दिडींत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना माजी सभापती चंद्रकांत बाईत यांनी खाऊ वाटप केले.
‘गुहागर लायन्स’च्या
अध्यक्षपदी मुसळे
गुहागर : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या नूतन कार्यकारिणी मंडळाचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच पाटपन्हाळे येथे पार पडला. या वेळी अध्यक्षपदी सचिन मुसळे, सचिवपदी शैलेंद्र खातू तर खजिनदारपदी नितीन बेंडल यांनी शपथ घेतली. या प्रसंगी लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष अनिकेत गोळे यांनी प्रास्ताविकात मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर अॅड. विजय जमदग्नी, इंडक्शन ऑफिसर पीएमजेएफ श्रीनिवास परांजपे, गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील, रिजन चेअरमन दिलीप जैन, झोन चेअरमन शामकांत खातू यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
खंडाळा स्कूलमध्ये
दिंडी सोहळा
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-मिरवणे येथील खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरा केली. या वेळी शालेय शिक्षण कमिटी अध्यक्ष परशुराम जोग तसेच शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कारखानीस यांनी पालखीतील प्रतिमेचे पूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात केली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक आशिष वासावे, पर्यवेक्षिका देविका मांगले आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. या मंगलमय दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी वारकरी परंपरेचा आदर्श ठेवत विठ्ठलभक्तीचा अनुभव घेतला. त्यानंतर कांबळे लावगण ते खंडाळेश्वर मंदिरापर्यंत मुलांनी दिंडी काढली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.