जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
76173
76174
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळात आयोजन; तांबुळी, वेंगुर्लेसह कासार्डेतील मंडळ विजेते
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः येथील श्री देव मारूती मंदिर येथे आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ (तांबुळी), वारकरी भजन स्पर्धेत श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ (वेंगुर्ले) तर आंतरराज्यस्तरीय वारकरी दिंडी चक्री भजन स्पर्धेत श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (कासार्डे) विजेते ठरले.
येथील श्री देव मारूती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राम्हण देवस्थान समितीच्या वतीने भजन स्पर्धांचे आयोजन केले होते. संगीत भजन स्पर्धेत प्रथम स्वरधारा प्रा. भजन मंडळ (तांबुळी), द्वितीय दत्तगुरु प्रा. भजन मंडळ (वैभववाडी), तृतीय महापुरुष प्रा. भजन मंडळ (भोगवे), चतुर्थ कलेश्वर पूर्वीदेवी प्रा. भजन मंडळ (वेत्ये), पाचवा चिंतामणी प्रा. भजन मंडळ (सुरंगपाणी), उत्तेजनार्थ प्रथम समाधी पुरुष प्रा. भजन मंडळ (मळगाव), उत्तेजनार्थ द्वितीय साई खोडदेश्वर प्रा. भजन मंडळ (पिंगुळी). वैयत्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गायक विराज तांबे (दत्तकृपा प्रा. भजन मंडळ, वैभववाडी), उत्कृष्ट पखवाज वादक आबा मेस्त्री (रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ, तेंडोली), उत्कृष्ट तबला वादक ओंकार राऊळ (महापुरुष प्रा. भजन मंडळ, भोगवे), उत्कृष्ट हार्मोनिअम वादक वैभव सावंत (सद्गुरू संगीत भजन मंडळ, कुडाळ), उत्कृष्ट झांजवादक काव्या पवार (ब्राम्हण देव महिला भजन मंडळ, पावशी), उत्कृष्ट कोरस विठ्ठल रखुमाई प्रा. भजन मंडळ (आंदुर्ले) यांची निवड केली. स्पर्धेचे परीक्षण श्री. शेख गुरुजी (सावंतवाडी), संदेश किंजवडेकर (कुडाळ) व राजू सावंत (वर्दे) यांनी केले.
वारकरी भजन स्पर्धा निकाल-प्रथम श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ (वेंगुर्ला), द्वितीय श्री देव वेतोबा वारकरी भजन मंडळ (कोचरा), तृतीय श्री देवी भावई वारकरी भजन मंडळ (कोचरा), चतुर्थ श्री देव महापुरुष वारकरी भजन मंडळ (निवती), वैयत्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गायक महेश झाड (श्री देवी भावई वारकरी भजन मंडळ, कोचरा), उत्कृष्ट पखवाज प्रितेश मेतर (श्री देव महापुरुष वारकरी भजन मंडळ, निवती), उत्कृष्ट कोरस श्री रामेश्वर महिला वारकरी भजन मंडळ (वेंगुर्ले) व उत्कृष्ट नृत्य अविष्कार म्हणून श्री मुळपुरुष धावडेश्वर वारकरी भजन मंडळ (वेंगुर्ला) यांची निवड करण्यात आली. वारकरी दिंडी चक्री भजन स्पर्धा निकाल-प्रथम श्री देव महापुरुष प्रा. भजन मंडळ (कासार्डे), द्वितीय श्री साईकृपा प्रा.भजन मंडळ (कासार्डे), तृतीय श्री देव रवळनाथ प्रा. भजन मंडळ (राजापूर), चतुर्थ श्री देव धारेश्वर प्रा. भजन मंडळ (कासार्डे), वैयत्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गायक रणदीप गायकवाड (श्री देव महापुरुष मंडळ, कासार्डे), उत्कृष्ट पखवाज संदिप पवार (श्री देव महापुरुष मंडळ, कासार्डे), उत्कृष्ट कोरस श्री देव रामेश्वर प्रा. भजन मंडळ (साळीस्ते), उत्कृष्ट नृत्य अविष्कार म्हणून श्री देव महापुरुष प्रा.भजन मंडळ (कासार्डे) यांची निवड केली. स्पर्धेचे बक्षीस वितरण काल (ता.७) रात्री झाले. अरविंद शिरसाट, मंदार शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, सीए सागर तेली, प्रसाद धडाम, अमेय शिरसाट, राजेश महाडेश्वर, अभय शिरसाट, मयुर शिरसाट, चेतन पडते, प्रसाद शिरसाट, संदेश पडते, सुमेध साळवी, भुषण मठकर, दिपक भोगटे, राकेश कांदे, महेश ओटवणेकर, परिक्षक शेख गुरुजी, राजु सावंत, संदेश किंजवडेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.