कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध

कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध

Published on

कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध

खासगीकरणाचा मुद्दा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः केंद्राचे कर्मचारी विरोधी धोरण, खासगीकरण, नोकर कपातीकरण या विरोधात आवाज उठवण्यासाठी
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या सर्व घटक संघटना उद्या (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निदर्शने करणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येणार आहे.
शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून शासन धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची ऑनलाईन सभा झाली. जिल्हा कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सत्यवान माळवे, राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, सहसचिव सचिन माने, शिक्षक परिषदेचे भारत केसरकर, अध्यापक संघांचे अजय शिंदे, शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर, प्रशांत आडेलकर, सी. डी. चव्हाण, समीर परब, शिक्षक समितीचे विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर, पेन्शन हक्क संघटनचे राजू वजराटकर, पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे आदी उपास्थित होते.
------------
कोट
उद्याच्या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्य सहभागी होणार आहेत. जिल्ह्याभरातील सर्व कर्मचारी काळ्याफिती लावून काम करतील. सर्व घटक संघटनांच्या पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे
- राजन कोरगांवकर, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कर्मचारी समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com