शिडवणे शाळेत ‘इंग्रजी संभाषण’

शिडवणे शाळेत ‘इंग्रजी संभाषण’

Published on

76236

शिडवणे शाळेत
‘इंग्रजी संभाषण’
तळेरे ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ येथे इंग्रजी संभाषण एकदिवसीय ड्रिलिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई स्थित प्रसिद्ध मार्गदर्शक सुधाकर भोवड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी भोवड यांचे ‘इसेन्सियालीझम’ हे पुस्तक आणि शाल देऊन सत्कार केला. या कोर्समध्ये चौथी ते सातवीचे ३० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. भोवड यांनी १०० पेक्षा जास्त इंग्रजी वाक्यांचा सराव करून घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याला प्रोत्साहन मिळाले. हा इंग्रजी संभाषण ड्रिलिंग कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला असून, त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्यात नक्कीच सुधारणा होईल, अशी अपेक्षा भोवड यांनी व्यक्त केली.
---
76237

अपर पोलिस
अधीक्षकपदी
नवमी साटम
ओरोस ः कृषिकेश रावले यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या अपर पोलिस अधीक्षक पदावर सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या नवमी साटम यांची पदोन्नतीने शासनाने नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे त्या मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वरवडे-फळसेवाडीची येथील रहिवाशी असून, मुंबई-बोरीवली (पूर्व) येथे सध्या स्थायिक आहेत. त्या २०२१ बॅचच्या अधिकारी असून, आता सिंधुदुर्ग जिल्हा अपर पोलिस अधीक्षकपदी रुजू होणार आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com