१९ लघु पाटबंधाऱ्यांसाठी हवेत सव्वा पाच कोटी
लघुपाटबंधाऱ्यांसाठी सव्वापाच कोटींची गरज
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग; पाणीस्रोतांचे होणार बळकटीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांतर्गत जिल्ह्यातील १९ लघुपाटबंधारे योजनांचा प्रारूप आराखडा बनवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ५ कोटी २६ लाख २२ हजार निधीची आवश्यकता असून, आतापर्यंत ३ कोटी १७ लाख ५४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. अजूनही २ कोटी ८ लाख ६८ हजार रुपये आवश्यक आहेत, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पाणीस्रोतांचे बळकटीकरणासाठी बंधाऱ्यांच्या कामांचा आराखडा बनवण्यात आला आहे. त्या जिल्ह्यातील शेती-बागायतीलाही फायदा होणार आहे. या आराखड्यात संगमेश्वर तालुक्यातील ६, लांजा २, रत्नागिरी ६, दापोली २, चिपळूणमधील १ आणि गुहागर तालुक्यातील २ या कामांचा समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रकल्पांचा प्रारूप आराखडा तयार केलेला आहे. त्यात सर्वाधिक बंधाऱ्यांची कामे रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात आहेत. या योजनेतून २०२३-२४ या वर्षासाठी १ कोटी ९८ लाख आणि २०२४-२५ साठी ३ कोटी १७ लाख ५४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख नळपाणी योजनेत विहिरीजवळ बंधारा बांधण्यासाठी १४ लाख ९९ हजार ६२८ पैकी ९ लाख, देवळे बाजारपेठ मुख्य वहाळावरील बंधाऱ्यासाठी १९ लाख ९९ हजार ९२५ रुपयांपैकी १२ लाख, मोर्डे बंदर पऱ्यावरील बंधाऱ्यासाठी १९ लाख ९९ हजार ९८९ पैकी १२ लाख, कनकाडी शिंदेवाडी ब्राह्मणवाडी सार्वजनिक विहिरीजवळ बंधारा बांधण्यासाठी १९ लाख ९९ हजारांपैकी १२ लाख, कनकाडी बौद्धवाडी येथील सार्वजनिक विहिरीजवळ बंधारा बांधण्यासाठी १९ लाख ८२ हजारांपैकी १९ लाख तर कासारकोळवण कांडकरी मंदिर येथे पोस्ता पऱ्या बंधाऱ्यासाठी १५ लाखांपैकी ९ लाख मिळाले आहेत. निओशी गणेश विसर्जनाजवळ काँक्रिट बंधाऱ्यासाठी २० लाख १६ हजार ४२९ पैकी १२ लाख १० हजार, पन्हाळे आदिष्टी मंदिराजवळील बंधाऱ्यासाठी २४ पैकी १४ लाख प्राप्त झाले.
रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी मधलीवाडी व खालचीवाडीसाठी २८ लाख १७ हजार, पानवल सुरंगीचा पऱ्या बंधाऱ्यासाठी ३० लाख, फणसोप-जुवेवाडी धरणाजवळील वहाळावरील बंधाऱ्यासाठी १९ लाख ७९ हजार, गोळप मानेवाडी/ कातळवाडी नळपाणी पुरवठा योजनेवरील बंधाऱ्यासाठी २९ लाख, कसोप बनवाडी बंधाऱ्यासाठी १८ लाख, धामणसे-शिरखोल बंधारा व चरपाटासाठी ३० लाख, दापोली तालुक्यातील कांगवई पेडणेकरवाडी बंधाऱ्यासाठी १४ लाख ९१ हजार, देहेण देपोलकरवाडी बंधाऱ्यासाठी १४ लाख ९६ हजार, चिपळूण तालुक्यातील कापसाळ दुकानखोरी बंधाऱ्यासाठी १५ लाख, गुहागर तालुक्यातील अडूर नागझरी नळपाणी पुरवठा योजनेसाठी १२ लाख १६ हजार, गिमवी काजळी नदी बंधाऱ्यासाठी १२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.
चौकट...
चार बंधाऱ्यांवर ७७ लाख खर्च
रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडी-कातळवाडी नळपाणी पुरवठा योजना या विहिरीजवळ नदीला बंधारा बांधण्याच्या कामावर २९.१३ लाख, कसोप बनवाडी येथील बंधाऱ्यावर १८ लाख, दापोलीतील कांगवई पेडणेकरवाडीतील बंधारा कामावर १४.९१ लाख, देहेण देपोलकरवाडी येथील बंधाऱ्यावर १४.९६ लाख असा एकूण ७७ लाखांचा निधी खर्च झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.