जुन्या मीटरप्रमाणे बिले आकारा
76276
जुन्या मीटरप्रमाणे बिले आकारा
वीज ग्राहक संघटना; वेंगुर्लेत महावितरणला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ८ ः गेल्या तीन-चार महिन्यांत स्मार्ट मीटरची बिले भरमसाट येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहकांकडून या वाढीव वीज बिलांची वसुलीही केली जात आहे. हा प्रकार थांबवून जुन्या मीटरप्रमाणे बिले आकारावीत. स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर बसवावेत आणि स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना झालेला आर्थिक भुर्दंड महावितरणने उचलावा, अशी मागणी सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेतर्फे केली. याबाबतचे निवेदन येथील महावितरण कार्यालयास देण्यात आले.
वेंगुर्ले वीज ग्राहक संघटनेच्या वतीने स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या भरमसाट बिलांच्या विरोधात येथील महावितरण कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, किरण खानोलकर, डॉ. संजीव लिंगवत यांच्यासहित श्रीकृष्ण गावकर, कृष्णा मातोंडकर, किशोर तेरसे, शेखर परब, दत्ता धुरी, पांडुरंग मिसाळ, सतेज कुर्ले, लुईस डिसोजा, इम्तियाज मकानदार, वामन कुबल, श्री. तेरेखोलकर, प्रसाद मराठे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटर विरोधात गेली दोन वर्षे निवेदने दिली आहेत. यावेळी स्मार्ट मीटर न बसविण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी वीज ग्राहक संघटना व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. असे असताना बऱ्याच ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या गैरहजेरीत, दांडगाईने हे मीटर बसविण्याचे काम सुरूच आहे. गेली तीन ते चार महिने स्मार्ट मीटरची बिले भरमसाट व दुप्पट-तिप्पट येत असल्याचे निदर्शनास आले असून, महावितरणकडून बिलांची वसुलीही केली जात आहे. हे त्वरित थांबवून वीज बिले जुन्या मीटरप्रमाणे आकारावीत. वेंगुर्ले डिव्हिजनमध्ये १४५४ ग्राहकांच्या घरी बसविलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवावेत व नागरिकांना झालेला आर्थिक भुर्दंड उचलावा, अशी मागणी वेंगुर्ले वीज ग्राहक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
...................
‘जुन्या मीटरबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा’
यापुढे स्मार्ट मीटर वापरू नयेत. खराब झालेले मीटर स्मार्ट मीटरद्वारे बदलू नये, याबाबत कार्यकारी अभियंत्यांकडून एजन्सीला सूचना दिल्या आहेत. याबाबत तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल. स्मार्ट मीटर काढून पूर्वीप्रमाणे जुने मीटर बसविण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन वेंगुर्ले वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.