कामगार कायद्यांना कणकवलीत विरोध
76375
कामगार कायद्यांना कणकवलीत विरोध
आंदोलनाला ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा
कणकवली, ता. ९ ः केंद्र सरकारने खासगीकरण आणि काही कामगार कायदे प्रस्तावित केले आहेत. त्याविरोधात आज विविध कामगार संघटनांनी बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली शाखेसमोर निदर्शने केली.
या आंदोलनात बँक आणि इतर संस्थोमधील कामगारांसह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते. केंद्र सरकारने खासगीकरण थांबवावे. कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी कामगारांनी केली.
केंद्र आणि राज्य सरकार केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखत आहेत. या धोरणांमुळे कामगार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.
या आंदोलनामध्ये सुशांत नाईक यांच्यासह, गोपुरी आश्रमाचे सचिव बाळू मेस्त्री, ठाकरे शिवसेनेचे राजू राठोड, धीरज मेस्त्री तसेच महाराष्ट्र राज्य एम्प्लॉईज फेडरेशनचे सदस्य सहभागी झाले होते.