भक्तिमार्गाची ज्योत प्रज्वलित करणारे गावडे काका महाराज
76407
भक्तिमार्गाची ज्योत प्रज्वलित
करणारे गावडे काका महाराज
लीड
लाखो भाविकांच्या जीवनात भक्तिमार्गाची ज्योत प्रज्वलित करून जीवन सुगंधमय करण्याचे अलौकिक कार्य करणारे अध्यात्मिक सद्गुरू म्हणजेच श्री श्री १०८ महंत परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज. सद्गुरू श्री गावडे काका महाराजांनी अठरा वर्षांपूर्वीपासून माड्याचीवाडी या छोट्याशा गावात अध्यात्म रुजवायला सुरुवात केली. आज याची व्याप्ती देशभर पसरली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने याच तेजस्वी अध्यात्म विश्वाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
- एकनाथ गावडे, श्री सदगुरू भक्तसेवा न्यास अध्यक्ष, माड्याचीवाडी (कुडाळ)
......................
जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते आपल्याला ज्ञानमार्ग दाखवितात. योग्य विचारसरणी देतात आणि जीवनात योग्य दिशा दर्शवितात. गुरू-शिष्याच्या नात्यात गुरुपौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याने आपल्या गुरुशी उत्तराई होण्याचा, गुरू आणि शिष्य यामधील असलेले प्रेम व्यक्त करण्याचा, आपल्या भक्तांना, शिष्यांना गुरुच्या चरणी अखंड नतमस्तक होण्याचा दिवस.
भाविकांच्या जीवनात भक्तिमार्गाची ज्योत प्रज्वलित करून जीवन सुगंधमय करण्याचे अलौकिक कार्य करणारे सद्गुरू म्हणजेच श्री श्री १०८ महंत परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज. अठरा वर्षांपूर्वीपासून कुलदैवत श्री गावडोबाच्या आशीर्वादाने माड्याचीवाडी या छोट्याशा गावात अध्यात्म रुजवायला सुरुवात केली. त्यांच्या संकल्पनेतून अवघ्या तीन महिन्यांत श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभे करून माड्याचीवाडी ही पवित्र भूमी बनविली. या मंदिरात बसविलेली कृष्णशिला दगडातील चैतन्यरुपी स्वामींची मूर्ती ही देशातील स्वामींची पहिली मूर्ती आहे. कोकणातील मंदिर पर्यटन क्षेत्रात याची नोंद झाली आहे. माड्याचीवाडीतील स्वामींचे मंदिर व तांबाळ कृषी पर्यटन केंद्र यामुळे हे गाव जगाच्या नकाशात झळकवण्याचा काकांचा मानस सफल झाला आहे. श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास. रजि. माड्याचीवाडी धार्मिक व सामाजिक संस्था प्रगतीपथावर आहे. योगा कॉलेजच्या माध्यमातून २०२३ मध्ये ५५ व २०२४ मध्ये ४० योग शिक्षकांना रोजगार मिळाला आहे.
----
गुरुपौर्णिमा आनंदात साजरी करूया!
सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून पणजी (बेती) गोवा येथे स्वामींचे सुंदर असे मंदिर उभे राहिले आहे. साक्षात नारायणांनी सुरू केलेली गुरू परंपरा असून या परंपरेनुसार चालणारे आपण सर्व सद्गुरू गावडे काकांच्या चरणाशी लीन होऊया आणि गुरुपौर्णिमा आनंदात साजरी करूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.