कुडाळ रोटरी क्लब अध्यक्षपदी पवार
76408
कुडाळ रोटरी क्लब अध्यक्षपदी पवार
सचिवपदी मकरंद नाईक; उद्या पदग्रहण, पुरस्कार वितरण
कुडाळ, ता. ९ ः रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण समारंभ शुक्रवारी (ता. ११) महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित केला आहे. डिस्ट्रिक्ट ३१७०चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या नूतन अध्यक्षपदी राजीव पवार, सचिवपदी मकरंद नाईक, खजिनदारपदी राकेश म्हाडदळकर यांची निवड करण्यात आली, तर उपप्रांतपालपदी सचिन मदने व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीपदी प्रणय तेली यांची निवड झाली.
येथील हॉटेल स्पाइस कोकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ. संजय केसरे, नूतन अध्यक्ष श्री. पवार, सचिव श्री. नाईक, खजिनदार श्री. म्हाडदळकर, उपप्रांतपाल श्री. मदने, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्री. तेली, दिनेश आजगावकर, रवींद्र परब, डॉ. सायली प्रभू आदी उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्यात पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. पाटील, उपप्रांतपाल डॉ. विनया बाड, गव्हर्नर एरिया एड डॉ. विद्याधर तायशेटये आदी उपस्थित राहणार आहेत. यावर्षी रोटरी इंटरनॅशनलची नवीन थीम ‘युनिट फॉर गुड’ असेल. यावर्षीचा रोटरी व्यवसाय सेवा म्हणजे व्होकेशनल अॅवॉर्ड सरंबळचे प्रगत शेतकरी सुरेश परब यांना देण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून (कै.) राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार २०२५ साठी कुडाळ पडतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांची निवड केली असून त्यांना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे.
.........................
रोटरीचे इतर पदाधिकारी असे
आयपीपी-डॉ. संजय केसरे, उपाध्यक्ष-प्रमोद भोगटे, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी-डॉ. राजवर्धन देसाई, सार्जंट ॲट आर्मस-दिनेश आजगावकर, क्लब सर्व्हिस-कौस्तुभ पाटणकर, व्होकेशनल सर्व्हिस-अभिषेक माने, कम्युनिटी सर्व्हिस-अमित वळंजू, इंटरनॅशनल सर्व्हिस-प्रणय तेली, युथ सर्व्हिस-अजिंक्य जामसंडेकर, पोलिओ प्लस-डॉ. रवींद्र जोशी, चेअरमन क्लब ट्रेनर-रवींद्र परब, चेअरमन मेंबरशिप-नीता गोवेकर, चेअरमन क्लब ॲडमिनीस्ट्रेशन-गजानन कांदळगावकर, फाउंडेशन-शशिकांत चव्हाण, पब्लिक रिलेशन-एकनाथ पिंगुळकर, सर्व्हिस प्रोजेक्ट-डॉ. संजय सावंत, हिस्टोरियन-डॉ. योगेश नवांगुळ, कल्चरल-रुपेश तेली, सोशल मीडिया-सचिन मदने, इव्हेंट-मयुरेश शिरसाट, वुमन एपॉवरमेंट-सई तेली, स्पोर्ट्स डॉ. गिरीष राणे, मेन्टॉर-ॲड. राजीव बिले, सीए-गजान प्रभू, काशिनाथ सामंत, संजय पिंगुळकर, राजन बोभाटे, अभिजित परब, डी. के. परब.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.