कोळंबे ते शास्त्रीपुल मार्ग प्रवासासाठी धोकादायक

कोळंबे ते शास्त्रीपुल मार्ग प्रवासासाठी धोकादायक

Published on

- rat९p३.jpg-
२५N७६३४९
संगमेश्वर ः राष्ट्रीय महामार्गावर कोळंबे ते शास्त्रीपूल रस्त्यावर पडलेले खड्डे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग------लोगो

‘कोळंबे ते शास्त्रीपूल’ बनला धोकादायक
सोनवी पुलावर खड्डे; अपघाताला निमंत्रण, प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोळंबे ते शास्त्रीपूलदरम्यान ब्रिटिशकालीन सोनवी पुलावर पसरलेल्या खड्ड्याच्या साम्राज्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्याला रस्त्यावरील जीवघेणे खड्डे भरा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते; परंतु संबंधित ठेकेदाराने त्यांचे पालन अद्यापही केलेले नाही.
महामार्गावर बावनदी ते आरवलीपर्यंतच्या सुमारे ४० किलोमीटर अंतरापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच कूर्मगतीने केले जात आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बावनदी ते अरवलीदरम्यानच्या रस्त्यावर अपघातही झालेले आहेत. त्यात प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व घटनांना रस्त्यावरील खड्डे, डायवर्शन, मार्ग व सूचनाफलकांचा अभाव व ठेकेदाराचा नियोजनशून्य कारभारच समोर आला आहे. कोळंबे ते शास्त्रीपूल इथपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे खड्डे भरा, अशी मागणी वारंवार केली जात आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची पूर्णत: वाताहात झाली असून, पावसात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. ते खड्डे चुकवताना अपघात घडतात. रस्त्यावरील मातीमिश्रित पाणी ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. त्यामधून वादावादीचेही प्रसंग घडत आहेत. ८ दिवसांपूर्वी सामंत यांनी चिपळूणपर्यंत वाहनातून रस्त्याची पाहणी केली. ते संगमेश्वर येथे थांबले होते. त्या वेळी त्यांच्यापुढे या रस्त्याबाबतची समस्या नागरिकांनी मांडली होती. तेव्हा त्यांनी ठेकेदार तसेच उपस्थित प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील शनिवारपर्यंत खड्डे भरा, अशा सूचना दिल्या होत्या. पालकमंत्री आठ दिवसांनी शनिवारी या मार्गावरून गेले; परंतु रस्त्यावरील खड्डे जैसे थेच आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com