विशाल सेवा फाउंडेशनतर्फे वेंगुर्ले रुग्णालयात उपक्रम
‘विशाल सेवा’तर्फे
रुग्णालयास मदत
वेंगुर्लेः विशाल सेवा फाउंडेशन आणि कार्यकर्त्यांच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे कपडे तसेच चादरी स्वच्छ करता याव्यात, यासाठी वॉशिंग मशीन व मेडिकल किट देण्यात आले. यावेळी उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटपही करण्यात आली. याप्रसंगी परब यांनी, ‘सेवा हेच संघटन’ ही शिकवण घेऊन मी माझ्या सामाजिक जीवनात वावरलो. गोरगरिबांची सेवा हाच माझ्या रक्ताचा धर्म असून तो आयुष्यभर जपणार. चांगल्या कामात परमेश्वर मला निश्चितपणे बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परब यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. या उपक्रमासाठी विशाल सेवा फाउंडेशनचे केतन आजगावकर, प्रशांत नाईक, गणपत राऊळ, अजित नाईक, सचिन शेट्ये, राजू रगजी, श्रीकांत राजाध्यक्ष, दीपेश केरकर, बाबू टेमकर, नीलेश मांजरेकर, साईप्रसाद नाईक, राजेश करंगुटकर, प्रसाद शिंदे, संदीप गावडे, विनायक मांजरेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी डॉ. गणेश गुट्टे, डॉ. निखिल, इन्चार्ज सिस्टर पी. एफ. डिसोजा तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.