देवगड रोटरीचे आज पदग्रहण
देवगड रोटरीचे
आज पदग्रहण
देवगड ः येथील रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्या अध्यक्षपदी गौरव पारकर, सचिवपदी अनुश्री पारकर यांची तर खजिनदारपदी दयानंद पाटील यांची निवड झाली. ही निवड २०२५-२६ वर्षासाठी आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम उद्या (ता.१०) सायंकाळी ७ वाजता अरुण भंडारे यांच्या हस्ते व सचिन मदने यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी डॉ. विद्याधर तायशेट्ये, प्रणय तेली आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन मावळत्या अध्यक्षा मनस्वी घारे यांनी केले आहे.
..................
बीडवाडीत आज
धार्मिक कार्यक्रम
कणकवली ः बीडवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिर येथे उद्या (ता. १०) गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी ७ पासून श्रींची महापूजा, अभिषेक सेवा, दुपारी १ वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्रींच्या चरणावर विविध सूक्त अभिषेक सेवा, सायंकाळी ७ वाजता नामस्मरण सेवा, ७.३० वाजता आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
......................
कोईळ मंदिरात
आज गुरुपौर्णिमा
मसुरे ः कोईळ येथील श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज मंदिर येथे उद्या (ता. १०) विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, ९ ते ११ या वेळेत महाअभिषेक, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत सुस्वर भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गणपती देवस्थान ट्रस्ट, कोईळ यांनी केले आहे.