‘हितचिंतकां’च्या धमक्यांना घाबरत नाही

‘हितचिंतकां’च्या धमक्यांना घाबरत नाही

Published on

76507

‘हितचिंतकां’च्या धमक्यांना घाबरत नाही

रुपेश राऊळ ः न्याय मिळेपर्यंत प्रिया चव्हाण कुटुबीयांसोबत राहू

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित प्रणाली माने व त्यांच्या कुटुंबीयांचे एका राजकीय व्यक्तीसोबतचे फोटो एका अनोळखी व्यक्तीने माझ्या व्हॉट्सअॅपला पाठविले आहेत. त्याच्याखाली ‘आपला हितचिंतक’ असा मेसेजही त्यांनी लिहिला आहे. प्रिया चव्हाण कुटुंबीयांची शिवसैनिक या नात्याने आम्ही भेट घेऊन त्यांना धीर दिला. मात्र, संबंधित या फोटोच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा धमक्यांना भीक घालत नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला.
श्री. राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गौंडळकर, अशोक धुरी, फिलिप्स रॉड्रिग्स, आशिष सुभेदार, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ म्हणाले, ‘सावंतवाडी येथील प्रिया माने या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी येथील पोलिस योग्य तपास करत आहेत. या गुन्ह्यात देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांच्या मुलावर गुन्हाही दाखल झाला आहे. संबंधित संशयितांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. मात्र, या प्रकरणामध्ये अन्य काहींचा हात असू शकतो, या शक्यतेने पोलिसांनी तसा तपास करावा आणि ज्यांचा यामध्ये हात असेल, त्यांना सहआरोपी करावे, ही आमची मागणी आहे. एक शिवसैनिक या नात्याने चव्हाण कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर देत त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे राजकारण करण्याचा आमचा हेतू नसताना माझ्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. त्यामध्ये त्यांनी संशयित प्रणाली माने यांच्या कुटुंबीयांचे राजकीय व्यक्तीसोबत असलेले फोटो पाठविले व त्या फोटोखाली ‘आपला हितचिंतक’ असा मेसेजही टाकला. एकूणच या मेसेजमागचा त्या व्यक्तीचा हेतू काय, हे यानिमित्ताने पुढे आले आहे. या प्रकरणी आम्ही आवाज उठवू नये, यासाठी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असेल तर अशा फुकाच्या धमक्यांना एक शिवसैनिक म्हणून आम्ही भीक घालत नाही. सावंतवाडी पोलिसांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन तपास केला पाहिजे. स्वतःहून या संदर्भात पोलिसांत जाणार नाही, वाटल्यास पोलिसांनी मला बोलावून घ्यावे. माझा मोबाईलही पोलिसांना देईन. मात्र, आमचा आवाज दाबण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते कदापि सहन करणार नाही. शिवसेना पक्ष अन्याय होणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. चव्हाण कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.’’
.................
... तर त्याला सहआरोपी करा
माझ्या व्हॉट्सअॅपला ज्या व्यक्तीने फोटो पाठविले, त्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांनी करावा. तसे निष्पन्न झाल्यास त्याला सहआरोपी करावे, अशी मागणी यावेळी श्री. राऊळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com