वेत्ये विद्यामंदिरास दोन कपाटे प्रदान
वेत्ये विद्यामंदिरास
दोन कपाटे प्रदान
सावंतवाडी ः कलेश्वर पूर्वीदेवी ग्रामस्थ मंडळ, मुंबई व वेत्ये यांनी आपल्या गावातील कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेसाठी दोन कपाटे प्रदान केली. मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ जाधव, सचिव प्रकाश गावकर, गुरुनाथ गावकर, सुरेश धारगळकर, कृष्णा गावकर, चंद्रकांत खांबल, रामा गावडे, चंद्रकांत केसरकर, दिलीप सातार्डेकर आदी मंडळाचे मुंबई स्थित कार्यकर्ते उपस्थित होते. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व उपसरपंच महेश गावडे यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती रमेश गावकर यांनी मंडळाच्या दातृत्वाचे कौतुक केले. सायली गावकर, परशुराम पाटकर, पुंडलिक देऊलकर, मधुकर गावडे, भरत जाधव, मनाली गावकर, दीक्षा नाईक, कृतिका गावडे आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष जाधव व सचिव गावकर यांनी शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहन केले. सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंपाकी यांचाही सत्कार करण्यात आला.
............
बीएएमएस परीक्षेत
पद्मा केळकरचे यश
वेंगुर्ले ः गोवा विद्यापीठाने गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संशोधन केंद्र शिरोडा येथे मे २०२५ मध्ये घेतलेल्या चौथ्या वर्षाच्या बीएएमएस (आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया पदवी) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत वेंगुर्ले-दाभोली येथील पद्मा कृष्णाजी केळकर हिने गोवा विद्यापीठात ७२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. गोवा विद्यापीठाचे गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संशोधन केंद्र शिरोडा-गोवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र बखले, श्री. सावईकर, सचिव प्राचार्य डॉ. नीलेश कोरडे, माजी प्राचार्य डॉ. अनुरा बाळे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. वेंगुर्ले होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर यांची ती कन्या होय.