सिंधुदुर्गात खतांचा मुबलक साठा

सिंधुदुर्गात खतांचा मुबलक साठा

Published on

सिंधुदुर्गात खतांचा मुबलक साठा

कृषी विभाग; पॉस मशिनचा वापर करूनच विक्री

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः जिल्ह्यात १० हजार ९५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाल्याने गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला खतांचा तुटवडा दूर झाला आहे, असे स्पष्टीकरण कृषी विभागाने दिले आहे. पॉस मशीनचा वापर करूनच खत विक्री करावी. खत विक्री आणि साठा यामध्ये साम्य न आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाईचे संकेतही देण्यात आले.
खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. युरिया आणि डीएपी या खतांचा तुटवडा अधिक होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांत खतांची उपलब्धता होऊ लागली. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९ हजार ५५७ मेट्रिक टन खतांची गरज असते. जून अखेर १२ हजार २५९ मेट्रिक टन खतांचे आवटन मंजूर होते. पैकी केवळ ५ हजार ९६० मेट्रिक इतके खत उपलब्ध झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला. भात रोपवाटिका आणि भातरोप पुनर्लागवडीच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे खत तुटवड्याची नोंद केली होती. याशिवाय ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खत पुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, आता जिल्ह्यात जून अखेर मंजूर आवटनाच्या ८२ टक्के खत उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत १० हजार ९५ टन खत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुटवड्याची समस्या दूर झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार १९७ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे.
---
आणखी खत उपलब्ध होणार
याशिवाय काही खत कंपन्यांशी चर्चा सुरू असून, येत्या आठवड्यात रत्नागिरी येथे आणखी खत उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाने अनुदानित सर्व खते पॉस मशीनद्‌वारे विक्री करावयाची आहेत. विक्री केंद्रांनी खतविक्री आणि साठा वेळच्यावेळी अद्यावत करावा. त्यामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे संकेत देखील जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com