जखमी हरियाल पक्षाला आणले घरी
-rat९p१०.jpg-
२५N७६३८४
दापोली ः जखमी झालेल्या हरियाल पक्ष्याची देखभाल करताना निसर्गप्रेमी कविता मराठे.
-----
जखमी हरियाल पक्ष्याला दिले जीवदान
निसर्गप्रेमी दाम्पत्याचा पुढाकार ; पायाला दुखापत
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ९ ः तालुक्यातील जालगाव येथील मराठे दाम्पत्याने हरियाल या राज्यपक्षाला जीवनदान दिले. तालुक्यातील जालगाव येथील कविता आणि दत्तात्रय मराठे या निसर्गप्रेमी दाम्पत्याला त्यांच्या अंगणात अचानक काहीतरी पडल्याचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आवाज आला. त्यांनी पाहिले असता एक हिरवट रंगाचा पक्षी पडल्याचे दिसले. तत्परतेने त्यांनी त्या पक्ष्याला उचलून घरात आणले. त्यास खाऊ-पिऊ दिले. पायाला दुखापत असल्याने तो चालू शकत नव्हता.
मराठे यांनी डॉ. प्रशांत परांजपे यांच्याकडे संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यांनी त्वरित वनविभागाकडे संपर्क करून त्या राज्य पक्षी हरियालला वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने उपचार करून सध्या या पक्ष्याला देखरेखीखाली ठेवले आहे. कोणीतरी शिकारीसाठी बेचकीने दगड मारला असल्याने सदरचा पक्षी जखमी झाला असल्याचे वनविभागाचे अधिकारी खोत यांनी सांगितले. पक्ष्यांना त्रास देऊ नका आणि गावातील पक्ष्याची अशी शिकार न करण्याचा सल्ला वनविभागाने दिला आहे.
हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. त्याला मराठीत ‘हरित कबूतर’ किंवा ‘हरोळी ’असेही म्हणतात. हा पक्षी दिसायला सुंदर असून, त्याचे पंख हिरव्या रंगाचे असतात. हरियाल प्रामुख्याने फळे खातो आणि वड, पिंपळ, उंबरासारख्या झाडांवर आढळतो. हा पक्षी शाकाहारी असून, फळे, कळ्या, कोंब आणि इतर धान्ये खातो. हा पक्षी स्वभावतः लाजाळू असतो. क्वचित जमिनीवर उतरतो तसेच महाराष्ट्रासोबतच गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब आणि आसामसारख्या राज्यांमध्येही हा आढळतो. याला मराठीत हरोळी, हरित कबूतर किंवा यलो-फुटेड ग्रीन पिजन असेही म्हणतात असे पर्यावरणप्रेमी डॉ. प्रशांत परांजपे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.