पर्यावरणपूरक व्यवसायांतून उन्नती शक्य

पर्यावरणपूरक व्यवसायांतून उन्नती शक्य

Published on

swt922.jpg
76510
सावंतवाडी ः मदर क्विन्स इंग्लिश स्कूल येथे प्रसाद गावडे यांचा सत्कार करताना खेमसावंत भोसले. बाजूला शुभदादेवी भोसले, लखमराजे भोसले व इतर.

पर्यावरणपूरक व्यवसायांतून उन्नती शक्य
प्रसाद गावडेः सावंतवाडीत पर्यावरण संवर्धन जनजागृती कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः येथील युवा वर्गाने पर्यावरणपूरक जीवनशैलीचे व येथील निसर्ग संपन्नतेचे महत्त्व वेळीच लक्षात घेऊन जैवविविधतेवर आधारित व्यवसायाच्या संधी हेरून निसर्गाच्या सानिध्यात दर्जेदार व समाधानी जीवन व्यतीत करावे. निसर्ग राखला तरच आपले अस्तित्व आहे, हे ध्यानी ठेवून माणसाची कृती निसर्गाला राखणारी, त्याचे जतन करणारी असावी, असे आवाहन ‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. गावडे बोलत होते. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, एस.पी.के. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य ठाकूर, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. गावडे यांनी कोकणातील निसर्गसंपदा, खाद्य संस्कृती, पारंपरिक जीवनमान, नैसर्गिक अधिवास यांचे महत्त्व विशद केले. आधुनिक जीवनशैलीच्या आकर्षणापायी तसेच स्वार्थापोटी निसर्गाला ओरबाडणे व निसर्गापासून दूर जाणे, याबद्दलची खंत व्यक्त करताना येथील स्थानिक लोकसंस्कृती व पर्यावरण राखण्याची जबाबदारी प्रत्येक कोकणी माणसाची व विशेषतः युवा वर्गाची आहे, हे अधोरेखित केले. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना कोकणी माणसाने लोभापायी किंवा कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या जमिनी शाबूत ठेवणे व येथील निसर्गाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. येथील शेती, मृदा, प्राणी, पक्षी, डोंगर, जलस्रोत यांच्या राखणदाराची भूमिका पार पाडावी, असे सांगितले.
सूत्रसंचालन सहशिक्षक गोविंद प्रभू यांनी केले. योगेश चव्हाण, प्रशांत गावकर, कुलदीप कालवणकर, भूषण परब आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com