छोट्या व्यापाऱ्यांनी कोळोशी गजबजली

छोट्या व्यापाऱ्यांनी कोळोशी गजबजली

Published on

swt1012.jpg
76592
कोळोशीः बाजारात रानभाजी विक्री करताना विद्यार्थी. (छायाचित्र ः पल्लवी सावंत)

छोट्या व्यापाऱ्यांनी कोळोशी गजबजली
विद्यार्थ्यांकडून रानभाजी विक्रीः हडपीड हायस्कूलमध्ये व्यावहारिक धडे
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १० ः शेती कामात व्यस्त शेतकऱ्यांमुळे सध्या तुरळक माणसे दिसणारा कोळोशी आठवडी बाजार बुधवारी (ता. ९) गजबजून गेला. ‘रानभाजी घ्या रानभाजी’ अशा कोवळ्या आवाजांतील व्यापाऱ्यांनी आपल्या नाजूक आवाजात आरोळी देत गिऱ्हाईकांना आपलेसे करत शेकडो रुपयांचा गल्ला जमवला. कोळोशी-हडपीड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई केली. भर पावसातही या गणवेशधारी व्यापारांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
‌माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपीडच्या वतीने मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक व व्यावसायिक शिक्षणाचे धडेही एक दिवस प्रत्यक्षात अनुभवायला मिळावेत, यासाठी बुधवारी (ता. ९) कोळोशी आठवडी बाजारात विद्यार्थ्यांना रानभाज्या विक्री करून खरी कमाई करण्याचा उपक्रम घेतला. या उपक्रमास स्थानिक नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद देत मुलांचा उत्साह वाढवत कौतुक केले.
या छोट्या व्यापाऱ्यांनीही आपले कौशल्य वापरत आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मुलांचाही उत्साह वाढला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, शिरगाव केंद्र प्रमुख सौ. राणे, मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, हडपीड सरपंच संध्या राणे, शिक्षण प्रसारक मंडळ कार्यवाह सुरेश राणे, शाळा समिती अध्यक्ष किशोर राणे, सदस्य चंद्रकांत शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले. मान्यवरांनी या उपक्रमात सहभागी होत मुलांकडून भाजी खरेदी करून या उपक्रमास हातभार लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com