चिपळूण -कोकण रेल्वेच्या प्रश्नांवर परिवहन मंत्र्यांकडे बैठक
- rat१०p१.jpg-
२५N७६५६२
मुंबई : कोकण रेल्वेच्या संदर्भातील प्रश्नांवर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री प्रताप सरनाईक, आमदार भास्कर जाधव आदी.
‘कोरे’ मार्गावरील पॅसेंजर दादरपर्यंत सोडा
आमदार भास्कर जाधव ः परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक
(चार कॉलमध्ये घ्यावी)
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : कोकण रेल्वेमार्गावरील पॅसेंजर गाडी दादर ते रत्नागिरी अशी सोडावी आणि पनवेल ते चिपळूणदरम्यान नवीन गाडी सुरू करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. त्यांनीही या विषयाची गंभीर दखल घेतली असून, त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
कोकणातील रेल्वे प्रवाशांना दररोज होणाऱ्या त्रासाबाबत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बुधवारी (ता. ९) मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीचे आयोजन आमदार जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कोकण रेल्वेमार्गावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधत जाधव यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे, पनवेल ते चिपळूणदरम्यान नवीन गाडी सुरू करणे तसेच रत्नागिरी व चिपळूण येथे रेल्वे आरक्षण कोटा वाढवणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश होता. या बैठकीला उपस्थित असलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, या प्रस्तावांना रेल्वेबोर्डाकडून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द दिला. या बैठकीमुळे कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांच्या अडचणी लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार जाधव यांच्या सक्रिय सहभागामुळे ही बैठक फलदायी ठरली असून प्रवाशांच्या हितासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच जाधव यांनी विधानसभेतही कोकण रेल्वेसंबंधात प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.
---
प्रवाशांचे प्रश्न लागणार मार्गी
कोकण रेल्वेमार्गावरील पॅसेंजर गाडी दादर ते रत्नागिरी सोडावी आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान नवी गाडी सुरू करावी यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पुढाकार घेत परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक घेतली. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी लवकर सुटतील अशी आशा निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.