सिंधुदुर्गात कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी
swt1030.jpg
76669
देवगड ः येथे कर्करोग निदानासाठी आलेल्या कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅनमध्ये तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली.
सिंधुदुर्गात कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी
कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन दाखलः ग्रामीण रुग्णांलयांमध्ये शिबिराचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १०ः कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन जिल्ह्यात दाखल झाली असून पुढील एक महिना कालावधीमध्ये जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी करणार आहे. ग्रामीण रुग्णालय देवगड येथून या कर्करोग तपासणी सेवेला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामिण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णांची तपासणी करणार आहे. देवगड ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी भेट देवून कामकाजाची पहाणी केली. या व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणीसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनचे तालुकानिहाय शिबिरांच्या ठिकाणाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार काल (ता.९) देवगड ग्रामिण रुग्णालय, आज प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल, उद्या (ता.११) प्राथमिक आरोग्य केंद्र मिठबांव, १२ ला प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल, १४ ला प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा, १५ ला ग्रामीण रुग्णालय मालवण, १६ ला प्राथमिक आरोग्य केंद्र चौके, १७ ला प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे, १८ ला उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, १९ ला उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, २१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस, २२ ला प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी, २३ ला ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग, २४ ला प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगांव, २५ ला प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, २६ ला प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली, २८ ला उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, ३० ला प्राथमिक आरोग्य केंद्र माणगांव, ३१ ला महिला रुग्णालय कुडाळ, १ ऑगस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पणदुर, २ ऑगस्ट जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, ४ ला रुग्णालय कणकवली, ५ ला प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र कनेडी, ६ ला प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव, ७ ला प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडा, ८ ला प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे, ९ ला ग्रामीण रुग्णालय वैभववाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी या संस्थासाठी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शिबिर होणार आहे.
चौकट
कर्करोगाची लक्षणे
* शरीरातील कोणत्याही अवयवांमध्ये सुज येणे
* तीळ, मस्सा यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे
* न भरणारी जखम
* सतत ताप किंवा वजनात घट होणे
* ४ आठवड्यांपेक्षा अधिक काळची अंगदुखी
----------------
चौकट
आरोग्य विभागाचे आवाहन
कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मधील तज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत तपासणी करून घेण्यासाठी ३ आठवड्यापेक्षा अधिक तोंड किंवा जीभेवर घाव, ३ आठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला असल्यास, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा येणे, तोंड उघडायला त्रास होणे, स्तनांमध्ये गाठ, स्तनाच्या आकारात बदल, स्तनाग्रामधून पू किंवा रक्तस्त्राव, मासिक पाळी व्यतिरिक्त रक्तस्त्राव, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होणे, शारिरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे आदी लक्षणे असलेल्यांनी या शिबिरात सहभागी होवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.