नेरुर येथे आज आरोग्य शिबिर
नेरुर येथे आज
आरोग्य शिबिर
कुडाळः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या २००३ च्या स्थापनेपासून २०२३ पर्यंत संस्थेच्या वाटचालीत मोठा वाटा असणारे (कै.) सिद्धेश गाळवणकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनाच्या निमित्ताने यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर येथे बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ यांच्या वतीने उद्या (ता. ११) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा उपयोग करून सेवा दिली जाणार आहे. डॉ. राहुल गवाणकर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. शिबिरामध्ये हिमोग्लोबीन, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण, इसीजी व एक्स-रे आदी चाचण्या केल्या जाणार आहेत. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.
...................
निवेतनधारकांची
बुधवारी बैठक
सिंधुदुर्गनगरीः महिला निवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील लाभार्थी बँक व सरकारी सेवा-सुविधांशी संबंधित अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी बैठकीचे आयोजन बुधवारी (ता. १६) सकाळी ११.३० वाजता स्वामी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, तळमजला, दालन क्रमांक १२४, सिंधुर्गनगरी येथे होणार आहे. या बैठकीला निवेतनधारक विद्यार्थी, संबंधित अधिकारी व बँक सदस्य उपस्थित राहणार आहेत. संबंधित निवेतनधारकांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी केले आहे.
.....................
कणकवलीत उद्या
ऑनलाईन वेबिनार
कणकवलीः तालुका व्यापारी संघ व कणकवली महाविद्यालय यांच्यावतीने शनिवारी (ता. १२) सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसील हॉल येथे एआय ऑनलाईन वेबिनार आयोजित केले आहे. यात आयआयटी (आयएसएम) धनबाद येथील सीनिअर प्रोड्यूसर मॅनेजर विनय सामंत हे ''कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवन यावर होणारा परिणाम'' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. सातोसे, राजा राज्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.