ग्रामीण, दुर्गम भागापर्यंत योग पोहोचवा

ग्रामीण, दुर्गम भागापर्यंत योग पोहोचवा

Published on

-rat१०p१५.jpg-
२५N७६६४४
रत्नागिरी : डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात योगशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. योगशिक्षकांसमवेत रमा जोग, संचालक डॉ. दिनकर मराठे आदी.
---
ग्रामीण, दुर्गम भागापर्यंत योग पोहोचवा
रमा जोग ः संस्कृत उपकेंद्रात गुरूपौर्णिमा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : आपल्या भारतीय संस्कृतीच्या गुरूपरंपरेतील महर्षी पतंजली यांनी योगशास्त्र अगदी सोप्या पद्धतीने ग्रंथांच्याद्वारे जनमानसासमोर ठेवले. सध्या अनेक प्रकारच्या व्याधी अगदी लहान वयातच होत आहेत. जीवन व्याधीमुक्त करण्याची ताकद योगामध्ये आहे. योगसाधकांनी आता ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत योग व त्याचे महत्व पोहोचवण्याचा निर्धार करावा, असे प्रतिपादन महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात आयोजित गुरूपौर्णिमा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रास्ताविकात उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले, सदाशिवापासून सुरू झालेल्या गुरूपरंपरेद्वारे भारतीय संस्कृतीला तत्त्वज्ञान, शास्त्रे यांचा संग्रह देऊ केला. गुरुशिष्याचे नाते भारताच्या कानकोपऱ्यात पदोपदी बघतो. आजच्या युगात विविध क्षेत्रात भारत विश्वाचे प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळे एकप्रकारे भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरा जगासाठी प्रेरणादायक आहे. या वेळी बी दी चेंज फाउंडेशन (शिर्डी) यांच्याकडून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी आणि प्रमोद कोनकर यांचा सत्कार केला.

चौकट १
योगशिक्षकांचा सन्मान
महर्षी व्यासांचा जन्मोत्सव व गुरुपौर्णिमेच्या औचित्याने जिल्ह्यातील योगक्षेत्रातील मान्यवरांना गुरुवंदना करून शाल, श्रीफळ, पुष्प, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. योगशिक्षिका नीता साने, ज्योती गावंड, समृद्धी दळी, प्रा. डॉ. निधी पटवर्धन, अॅड. विद्यानंद जोग, राजेश आयरे, विनय साने, प्रियांका एकावडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, डॉ. शशांक पाटील, अ‍ॅड. रुची महाजनी, श्रीकांत ढालकर, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, प्रा. सई ओक, स्वरूप काणे यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com