गुरूपौर्णिमोत्सवाला नाणीजला भाविकांची गर्दी

गुरूपौर्णिमोत्सवाला नाणीजला भाविकांची गर्दी

Published on

-rat१०p१८.jpg-
25N76718
रत्नागिरी ः नाणीजक्षेत्री जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज. सोबत डावीकडून ओमेश्वरीताई, कानिफनाथ महाराज, जगद्गुरूश्री सुप्रियाताई, देवयोगी आदी.

-rat१०p२१.jpg-
25N76719
नाणीज येथे झालेली भाविकांची गर्दी.
------
गुरुपौर्णिमोत्सवास नाणीजला भाविकांची गर्दी
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज; इचलकरंजीच्या दाम्पत्याला पूजेची संधी
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १० ः निसर्गरम्य वातावरणात नाणीज येथील श्रीक्षेत्री आज (ता. १०) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. लाखो भाविकांनी एकाचवेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे पूजन केले.
पहाटेपासूनच सुंदरगडावर भक्तांची गर्दी होती. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड अशा अनेक राज्यांतून भाविक श्रीक्षेत्री दाखल झालेले होते. सकाळी साडेआठ वाजता गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे सुंदरगडावर आगमन झाले. उपस्थित भक्तांमधील इचलकरंजीचे दाम्पत्य सौ. व श्री कुमार चव्हाण यांना पूजा करण्याची संधी मिळाली. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव सोहळा सुरू झाला. साऱ्या सुंदरगडावर एकाचवेळी झालेल्या घंटांच्या मधूर ध्वनीने परिसरात चैतन्य पसरलेले होते. दुपारी साडेबारापर्यंत पूजाविधी सुरू होता. संपूर्ण सुंदरगडावर जिकडेतिकडे भक्तच दिसत होते. पाय ठेवण्यासही जागा नव्हती. या सोहळ्याला कानिफनाथ महाराज, सुप्रियाताई, ओमेश्वरी ताई, देवयोगी, सिंदूरअंबिका असा जगद्गुरूश्रींचा सारा परिवार उपस्थित होता. या वेळी महाराज म्हणाले, आजची गुरूपौर्णिमा ही सर्वांसाठी पर्वणी होती. त्यातून सर्वांच्या जीवनाचे सोने होऊदे.
या प्रसंगी रात्री ८ वाजता कानिफनाथ महाराज यांचे हिंदीतून प्रवचन झाले. त्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे प्रवचन झाले.
अनेक दूरवरचे भाविक खास गाड्या करून आले होते. त्यामुळे नाणीजच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. आता महामार्ग रूंद झाल्यामुळे वाहतुकीची कसली अडचण आली नाही. रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी गर्दी केली होती. या निमित्ताने दोन दिवस सर्वांचा चांगला व्यवसाय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com