कणकवलीत गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रंथप्रदर्शन

कणकवलीत गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रंथप्रदर्शन

Published on

76774

कणकवलीत गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रंथप्रदर्शन
कणकवली, ता. ११ : शहरातील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये आज ग्रंथालय विभागामार्फत ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. ग्रंथपाल एम. डी. पवार यांच्या संकल्पनेतून ग्रंथालयाच्या वाचन कक्षात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वाचनीय अशा पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनात बालवाङ्मय, चरित्र वाङ्मय, वैचारिक वाङ्मय आकर्षक पद्धतीने मांडणी करून ठेवले होते.
प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यासाठी व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी हे प्रदर्शन दिवसभर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खुले ठेवले होते. या प्रदर्शनात मुख्याध्यापक पिराजी कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वणवे आदींनी शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी श्री.कांबळे यांनी ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत याबाबतचे महत्‍व विषद केले.

Marathi News Esakal
www.esakal.com