जिल्ह्यातील २४० गावात दिली अणुऊर्जा उपयोगाची माहिती
rat11p3.jpg
76802
राजापूर : जैतापूर येथे अॅटम ऑन व्हील्स या मोबाईल प्रदर्शनात विद्यार्थ्यांना माहिती देताना अधिकारी.
--------
जिल्ह्यातील २४० गावांत दिली
अणुऊर्जा उपयोगाची माहिती
रत्नागिरी, ता. ११ : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमार्फत (एनपीसीआयएल) जिल्ह्यात २४० गावांतील ४५ हजार २१६ लोकांना अणुऊर्जेविषयी माहिती देण्यात आली. अॅटम ऑन व्हील्स हे मोबाईल प्रदर्शन गेले चार महिने सुरू आहे.
मार्चपासून हे प्रदर्शन जिल्ह्यातील जैतापूर प्रकल्पाजवळील पाच तालुक्यांतील २४० गावांत नेण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून गावागावांमध्ये, शाळांमध्ये, बाजारपेठांमध्ये आणि सामुदायिक स्थळांवर जाऊन पॅनल्स, एलईडी टीव्ही, प्रोजेक्टर, पोस्टर्स आदींच्या साह्याने अणुऊर्जेची उपयुक्तता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक गावातील शालेय विद्यार्थी, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
येत्या काही महिन्यांत रत्नागिरी आणि इतर तालुक्यांतील अनेक गावांमध्ये या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर हेच ‘अॅटम ऑन व्हील्स’ प्रदर्शनामध्ये प्रदेशातील जबलपूर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी राबवले जाणार आहे. तिथेही स्थानिक लोकांना अणुऊर्जेच्या विविध पैलूंविषयी माहिती देऊन त्यांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती एनपीसीएलकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.