महास्वयंम वेबपोर्टलद्वारे ३० रोजी रोजगार मेळावा
महास्वयंम वेबपोर्टलद्वारे
३० रोजी रोजगार मेळावा
रत्नागिरीः जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ३० जुलैला सकाळी ११ वाजता शिरगाव येथील महर्षि कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे श्रीमती यशोदा यशवंत पवार सभागृहात केले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी किंवा उद्योजकांनी उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
......
राजापूरच्या फिजा मुकादमचा सत्कार
राजापूर ः तालुक्यातील वडदहसोळ गावची सुकन्या फिजा मुकादम हिने जी. एच. रायसोनी विद्यापिठातून बीएस्सी. फॉरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक विज्ञान शाखेतील पदवी) परीक्षेत विद्यापिठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर, खजिनदार हनिफ काझी, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, फिजाची आई गुलशन मुकादम, मुश्ताक इसफ, प्रा. प्रीतम सुर्वे, उमरफारूख मुजावर, शफिक वाघू आदी उपस्थित होते.
----
नारायण गोगटे
यांचा स्मृतिदिन
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महविद्यालयाचे (स्वायत्त) देणगीदार (कै.) नारायण रथुनाथ गोगटे यांचा स्मृतिदिन झाला. (कै.) बाबुराव जोशी आणि (कै.) मालतीबाई जोशी यांनी १९४५ मध्ये महाविद्यालय सुरू करण्याचे धाडस केले. त्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. (कै.) नारायण रथुनाथ तथा नानासाहेब गोगटे यांच्या उदार आणि सढळ आर्थिक मदतीमुळेच हे कार्य त्यांना शक्य झाले. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ र. प. गोगटे कला आणि विज्ञान महाविद्यालय या नावाने महाविद्यालय सुरू करण्यासाठी गोगटे यांनी देणगी दिली. नानासाहेबांची ही देणगी संस्थेच्या सुरवातीच्या काळात फार मोलाची ठरली. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.