स्थानिक फळे, भाजीपाला स्पर्धेत सात शेतकऱ्यांची मोहोर

स्थानिक फळे, भाजीपाला स्पर्धेत सात शेतकऱ्यांची मोहोर

Published on

76878
76879
लिंबाचे झाड व लिंबे
76880


स्थानिक फळे, भाजीपाला स्पर्धेत सात शेतकऱ्यांची मोहोर

कृषी विद्यापीठातर्फे आयोजन; वाणांच्या संवर्धनाला मिळणार चालना

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या फळे व भाजीपाला स्पर्धेवर सिंधुदुर्गातील सात शेतकऱ्यांनी मोहोर उमटविली आहे. या सात शेतकऱ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वैशिष्टयपुर्ण गुणधर्मामुळे सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक फळे आणि भाजीपाला वाणांचे संर्वधन, जतन आणि नोंदणीसाठी विद्यापीठ या शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करणार आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ आणि १८ मेस दापोली विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयाच्यावतीने कोकणातील स्थानिक फळे व भाजीपाला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून बक्षिस वितरण देखील १ जुलैला कृषी दिन झाले. या स्पर्धेकरिता उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे डॉ. प्रफुल्ल माळी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील स्थानिक वाणांची फळे आणि भाजीपाला संकलित केला होता. यातील सात शेतकऱ्यांनी प्रथम क्रमांक मिळवित विद्यापीठाच्या स्पर्धेवर ठसा उमटविला आहे. या शेतकऱ्यांमध्ये उदय सखाराम शेंडगे (रा. उपवडे, ता.कुडाळ) रसाळ फणस, अच्युत तेंडोलकर (रा. तेंडोली, ता.कुडाळ) जायफळ, आकाश नरसुले (रा. कुडासे, ता.दोडामार्ग) कागदी लिंबु, श्रीमती लक्ष्मी शेंडगे (रा. उपवडे, ता. कुडाळ) लाल कांदा, बी. डी. सावंत (रा. कोंडये, ता. कणकवली) चारोळी, श्रीमती अनिता ताम्हणकर (रा. गोठोस, ता. कुडाळ) वाल, प्रशांत पालव (रा. मुळदे, ता.कुडाळ) नीरफणस या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांनी स्पर्धेत सादर केलेल्या स्थानिक फळांमध्ये आणि वैशिष्टपुर्ण गुणधर्म आढळून आले आहेत. लिंबामध्ये रसाचे प्रमाण ९० टक्के असून वर्षभर उत्पादन देते. रसाळ फणसाच्या गऱ्यांचा रंग पिवळसर असून गोड आहे. एका नगाचे वजन १२ किलोपर्यत आहे. जायफळमध्ये ८० टक्के जुळी जायफळ आहेत. प्रति झाड १४०० ते १५०० फळे उत्पादन मिळते. लाल कांदा कमी तिखट असून कच्चा खाण्यास उत्तम आहे. चारोळीचा रंग जांभळट आणि रोग व किडीस प्रतिकारक आहे. वालीच्या शेंगा ८ ते १२ सेंटीमीटर लांब असून बाजारपेठेत त्यांना मोठी मागणी आहे. नीरफणस भाजीसाठी उत्तम आहे. त्याला देखील मोठी मागणी आहे. राष्ट्रीयस्तरावर पीपीव्ही एफआरए नावाचा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पातर्गंत स्थानिक वाणांचे संवर्धन, जतन आणि नोंदणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील या सर्व वाणांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विद्यापीठांकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले जात आहे. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे प्रकल्प प्रमुख डॉ. महेश शेंडगे, प्रा. हर्षद नाईक हे शेतकऱ्यांना नोंदणीविषयी मार्गदर्शन करीत आहेत.
--------------
कोट
राष्ट्रीय स्तरावर पीपीव्हीएफआरए हा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पातर्गंत स्थानिक वाणांचे संवर्धन, जतन आणि नोंदणी केली जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेतर्गंत अर्ज करावे यासाठी आग्रही असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत.
- डॉ. व्ही. व्ही. दळवी, प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे
----------------
दृष्टीक्षेपात
* फणस
- स्थानिक रसाळ फणस वाणांचे गरे रसाळ गोड आणि भरीव
- रंग पिवळसर
- गऱ्यांसह रसाचे प्रमाण अधिक
- फळाचे वजन १२ किलोपर्यत
- कच्चे फळ भाजीकरीता उत्तम
- एप्रिल-मे मध्ये काढणीस तयार
-----------
* स्थानिक कागदी लिंबू
- आकाराने लहान
- रसाचे प्रमाण ९० टक्के
- वर्षभर उत्पन्न देण्याची क्षमता (वर्षभरात ७०० ते ८०० फळांचे उत्पन्न)
- सरबत्तासाठी अतिशय उपयुक्त
---------------
* जायफळ
- जुळ्या फळांचे प्रमाण ८० टक्के
- जायपत्री भरीव असून रंग गडद
- प्रतीझाड १५०० फळांपर्यत उत्पादन
- हंगाम कालावधी ऑगस्ट
--------------
* लाल कांदा
- कमी तिखट असल्याने कच्चा खाण्यास उपयुक्त
- विद्राव्य घटक १०.१३ इतके
---------------
* चारोळी
- जांभळट रंग
- रोग प्रतिकारशक्ती अधिक
- किडरोगांना बळी पडत नाही
-----------------
* वाल
- या वाणाच्या शेंगा ८ ते १२ सेंटीमीटर लांब
- चवीला उत्तम
- किडरोगांचा प्रादुर्भाव कमी
- बाजारपेठेत मोठी मागणी
--------------
* नीरफणस
- भाजीसाठी प्रसिद्ध
- चवीला चांगला
- फळगळ अजिबात नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com