रत्नागिरी-दामले विद्यालयाचे तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

रत्नागिरी-दामले विद्यालयाचे तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Published on

rat११p२५.jpg-
७६८६८
रत्नागिरी ः शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले दामले विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आदी.
-----------
दामले विद्यालयाचे
तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरी पालिकेच्या दामले विद्यालयातील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ९ व ८वी शिष्यवृत्ती परीक्षेत ४ विद्यार्थी असे एकूण १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. दामले विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली.
या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षक जादा मागदर्शन करत असतात. या यशाबद्दल मुख्याध्यापक भगवान मोटे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्रद्धा गांगण, योगेश कदम, मुकेश पाटील, विशाल चव्हाण व आठवी शिष्यवृत्तीसाठी मंजिरी लिमये, रवींद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
५वी शिष्यवृत्तीत सान्वी शिवगण २६६ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत १ ली), राजवीर कुरणी २५६ गुण (८ वा), केयुरी नागवेकर २२८ गुण (४९ वी), दिनेश आखाडे २२६ गुण (५६ वा), अवनी कोकरे २२४ गुण (६५वी), संस्कृती गावीत २२२ गुण (७३वी), सावनी सरपोतदार २२० गुण (८२वी), स्वरा जोशी २२० गुण (८३वी), मृणाल जोशी २१० गुण (१०२ वी) यांनी यश मिळवले. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का जाधव २५८ गुण (१२ वी), आर्षती कारेकर २३८ गुण (२६ वी), आर्या पाध्ये २३४ गुण (३१वी), नीता आखाडे २०६ गुण (८६ वी) यांनी यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com