रत्नागिरी- पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

रत्नागिरी- पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

Published on

rat११p७.jpg-
N७६८१३
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.
-----------

पटवर्धन हायस्कूलचे चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
१३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; नित्या फणसे राज्यात तृतीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : येथील पटवर्धन शाळेच्या आठवीच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. यापैकी चार विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत झेप घेतली. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
नित्या फणसे हिने राज्यात तृतीय (जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत प्रथम, ९६ टक्के), आदित्य दामले राज्यात सहावा (शहरी गुणवत्ता यादी द्वितीय, ९४.६६ टक्के), ललित डोळ याने राज्यात बारावा (शहरी गुणवत्ता यादीत तृतीय ९२ टक्के), मधुरा पाटील हिने राज्यात सोळावा (शहरी गुणवत्ता यादीमध्ये चतुर्थ ९०.६६ टक्के) क्रमांक प्राप्त केला.
श्रावणी शेडेकर जिल्ह्यात २९वी (७८.६६ टक्के), सिद्धी भाटकर जिल्ह्यात ४०वी (७५.३३), स्वराज साळुंखे जिल्ह्यात ५१ वा (७३.३३), आदिती शेलार जिल्ह्यात ६०वी (७२), आश्लेषा काळे जिल्ह्यात ६१वी (७१.३३), अंतरा रायकर जिल्ह्यात ७०वी (७०.६७ टक्के), मैत्री सूर्यवंशी जिल्ह्यात ७२वी (७०.६७), आर्ची नाटेकर जिल्ह्यात ८७वी (६८.६७), यज्ञा मयेकर जिल्ह्यात ९१वी (६८) या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा यादीत स्थान मिळवले.
आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभागप्रमुख कौस्तुभ पालकर, प्रिती केळकर यांनी मराठीसाठी, गणितासाठी मीरा दामले, प्रतिभा बंडबे, प्रशांत वावरे; इंग्रजीसाठी प्रज्ञा डोंगरे, बुद्धिमत्तेसाठी श्रद्धा पिलणकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष नमिता कीर, श्रीराम भावे, दादा वणजू, सीए नचिकेत जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका शिरोळकर, लवंदे व उपमुख्याध्यापक पंगेरकर यांनीही मुलांचे कौतुक केले.

कोट
पटवर्धन हायस्कूलने आजवर शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल यश मिळवले आहे. यंदाही १३ विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे विशेष कौतुक.
- जानकी घाटविलकर, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com