रत्नागिरी- कोतवडे हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

रत्नागिरी- कोतवडे हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Published on

rat11p13.jpg-
76827
रत्नागिरी : शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे कोतवडे हायस्कूलचे विद्यार्थी. मागे उभे मुख्याध्यापक, शिक्षक.
-------
कोतवडे हायस्कूलचे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
रत्नागिरी, ता. ११ : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ, (मुंबई) संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेमधील आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले. प्रतीक गोताड याने गुणवत्ता यादीमध्ये ५४वा आणि आर्य शिंदे याने ८९ वा क्रमांक मिळवला.
या यशामध्ये शिक्षक दत्ताराम लिंगायत, आशिष जाधव, शरदचंद्र कुंभार, शिल्पा सुर्वे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. तसेच कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहकार्यवाह राजेंद्र फणसोपकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, सडये केंद्राचे केंद्रप्रमुख अमर घाटगे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com