डोंगरपाल माऊली विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप
76919
डोंगरपाल माऊली विद्यालयात
शैक्षणिक साहित्याचे वाटप
बांदा, ता. ११ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्येही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आज श्री माऊली विद्यामंदिर, डोंगरपाल येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेने आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड, अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये हे वाटप यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते जयेश सावंत, अमित गवस, सागर कुबल, अक्षय गवस, आरोही गवस, श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल संस्था सचिव नारायण सावंत, खजिनदार गुणाजी गवस, दीक्षा बांदेकर, रीना गाड यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्कूल किटमुळे शिक्षणाची वाट सुरळीत होईल. कोकण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक आधार उभा करत आहे, तो अत्यंत प्रशंसनीय आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, मीही मराठी शाळेचा विद्यार्थी असून शाळेच्या कार्यात मी कायम सहकार्य करेन, असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक संतोष वावळीये यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष विलास सावंत यांनी आभार मानले.
--------
76920
शिवानंद भिडे
76921
स्वप्नील धामापूरकर
76922
सुदन केसरकर
बांदा रोटरी क्लब अध्यक्षपदी भिडे
बांदा, ता. ११ ः येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे यांची, सचिवपदी स्वप्नील धामापूरकर यांची तर खजिनदारपदी सुदन केसरकर यांची निवड झाल्याची माहिती मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवारी (ता.१५) सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ हॉल, दोडामार्ग रोड, बांदा येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून अमित माटे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बांदा चे एजी डॉ. विनया बाड, डॉ. विद्याधर तायशेटे, राजेश घाटवळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रोटरी पदाधिकारी व रोटरी सदस्य हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. समाजातील गरजू आणि वंचितांसाठी रोटरी क्लब ऑफ बांदा नेहमीच सहकार्याची भावना जपत समाजोपयोगी कार्य करीत राहील. या कार्यात सर्व बांदावासियांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.