कुडाळमध्ये उद्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोज
76930
कुडाळमध्ये उद्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोज
१२०० धावपटूंची नोंदणी; एमआयडीसी येथून होणार प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन २०२५ तर्फे आयोजित हाफ मॅरेथॉनचे रविवारी (ता.१३) बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथे आयोजन केले आहे. ५, १०, १६ तसेच २१ किलोमीटरमधून आतापर्यंत १२०० धावपटूंनी नोंदणी केली आहे. सिंधुदुर्ग सोबतच मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी इथूनही धावपटू सहभागी झाले आहेत. या हाफ मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मॉन्सून रन सज्ज असल्याची माहिती राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. जी. टी. राणे यांनी दिली. या मॅरेथॉनचे प्रमोशन प्रसिद्ध आर्यनमॅन मिलिंद सोमण यांनी केले आहे.
टीम कुडाळ मॉन्सून रनचे हे दुसरे वर्ष आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आज बॅ नाथ पै एमआयडीसी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी डॉ. अजित राणे, गजानन कांदळगावकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रशांत मडव, रूपेश तेली, अमित तेंडोलकर, शिवप्रसाद राणे, सचिन मदने उपस्थित होते.
डॉ. राणे म्हणाले, ‘‘राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळने आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे. हॉस्पिटलतर्फे रोटरी क्लब कुडाळच्या सहयोगाने विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले जातात. व्यायाम व आरोग्य याबद्दलची जनजागृती व्हावी यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित केली आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसीएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज आहेत. या मॅरेथॉनसाठी जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जातील. कुडाळ एमआयडीसीमधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. ५ किलोमीटरची फन रेस असणार आहे. यामध्ये रोख बक्षिस नसणार आहे. पण, टी-शर्ट व डिजीटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे.१०,१६ व २१ किलोमीटर प्रकारात वयोगटानुसार आकर्षक रोख बक्षिसे व खुल्या गटासाठीही रोख आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.’’ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीने धावपटू वाढले आहेत. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग बाहेरील ५५० हून अधिक धावपटू आहेत, अशी माहिती यावेळी उद्योजक अजित राणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.