बसरा स्टार जहाज 
५ वर्षांनी भंगारात

बसरा स्टार जहाज ५ वर्षांनी भंगारात

Published on

बसरा स्टार जहाज
५ वर्षांनी भंगारात
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज अखेर पाच वर्षानंतर भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. जहाजाचे काही भाग कापून ते क्रेनने किनाऱ्यावर काढण्यात सुरवात झाली. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीने या संदर्भात केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केला. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाजाचा मुक्काम अजून वाढला आहे. २ जून २०२५ या जहाजाला किनाऱ्यावर अडकून पाच वर्षे झाली आहेत. किनारा सुरक्षेच्यादृष्टीने हे जहाज हटवण्यास यंत्रणांना पाच वर्षानंतर यश आले. ३५ कोटीचे हे जहाज अवघ्या २ कोटीमध्ये भंगारात काढण्यात आल्याचे समजते. त्यासाठी एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनी या संदर्भात कस्टम, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार सुरू केला आहे. मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाज भंगारात काढल्यानंतर त्याचे तुकडे करण्यास सुरवात करण्यात आली आहे. सेल्फी पॉईंट ठरलेले हे जहाज पुढील काही दिवसात नष्ट होणार आहे.
----
आरोग्यमंदिर येथून
मोटार पळवली
रत्नागिरी ः शहरातील मारूती मंदिर ते साळवीस्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर आरोग्यमंदिर येथे दुकानाच्या समोर लावलेली मोटार अज्ञात चोरट्याने पळवली. संशयित चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंदिर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बशीर मुसा काझी (वय ५८, रा. एमआयडीसी झाडगाव, रत्नागिरी) हे मोटार (क्र. एमएच-०८ एजी २१६६) घेऊन साळवीस्टॉप येथे घरगुती कामासाठी निघाले होते. औषधे घ्यायची असल्याने ते मिल्लतनगरमार्गे आरोग्यमंदिर येथे आले. तेथे लॉरेन्स अॅन्ड मेयो या दुकानासमोर, पानवलकर कॉलनी आरोग्यमंदिर येथे गाडी उभी करून गडबडीमध्ये चावी गाडीला ठेवून रस्त्याच्या पलीकडील बाजूला असलेल्या दुकानात औषधे घेण्याकरिता गेले. तेथे औषधे खरेदी करून झाल्यानंतर आरोग्यमंदिर येथे गाडीजवळ आले असता त्यांना गाडी दिसून आली नाही.
---
पोषण आहाराची
पाकिटे कचऱ्यात
गुहागर : तालुक्यातील जानवळे फाटा शेजारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाकिटे टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर आक्रमक झाले असून, शाळेचा पोषण आहार की, अंगणवाडीचा पोषण आहार याची शासनाने तत्काळ चौकशी करावी, अशी आग्रही मागणी विनोद जानवळकर यांनी केली आहे. या संदर्भात जानवळकर यांनी सांगितले, महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करते; मात्र त्याची मुदत संपण्याआधीच शासनाच्या पोषण आहार खिचडीची पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळून आली, याची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका पवित्रा घेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com