हातलोट घाटात रूंदाकरण,सुधारणाना गती

हातलोट घाटात रूंदाकरण,सुधारणाना गती

Published on

rat११p३१.jpg -
P२५N७६९३४
खेड - मंत्रालय दालनात मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी हातलोट घाटप्रश्नी चर्चा करताना कदम व सोबत मान्यवर.

हातलोट घाटातील रूंदीकरण, सुधारणांना गती
रत्नागिरी-सातारा जोडणारा मार्ग ; वनजमिनीचे संपादन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणाऱ्या तसेच रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या हातलोट घाटरस्त्याच्या सुधारणा व रूंदीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. विधानभवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गृहराज्यमंत्री आणि आमदार योगेश कदम यांनी सक्रिय भूमिका घेतली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी महत्वाचे निर्णय व पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली.
वनविभागाची जमीन संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले असून, यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून या घाटाचे काम रखडले होते. तत्कालीन पर्यावरणमंत्री आणि विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठपुरावा केला होता.
सध्या योगेश कदम यांनी ही जबाबदारी स्वतः घेतली असून, वनविभाग व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी बैठक घेतली. त्यांचा पुढाकार हाच या रस्त्याच्या प्रगतीचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

चौकट
हातलोट घाटाचे महत्व
खेड-बिरमणी-हातलोट घाटमार्ग पूर्णत्वास गेल्यास रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील अंतर लक्षणीय कमी होणार आहे. यामुळे खेड तालुक्यातील तसेच महाबळेश्वर भागातील दुर्गम आणि दुर्लक्षित गावांचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. हा घाट केवळ दोन जिल्हेच नव्हे तर रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा सर्वात जवळचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. त्यामुळे पर्यटन, वाहतूक आणि स्थानिक विकासासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

कोट
या रस्त्याचे काम पूर्ण झाले तर अनेक गावांमध्ये विकासाची गती वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा आहे.
- विठ्ठल मोरे, बिरमणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com