बांदा खेमराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे
77049
बांदा खेमराज हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या वतीने येथील खेमराज हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘संस्कारवाट’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रसाद म्हैसकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीकोन आचरणात आणावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले किल्ले तहात देऊन देखील ते हतबल झाले नाहीत तर, त्यांनी नव्या जोमाने ते किल्ले परत मिळविले. तसेच तुम्ही देखील काही अपयश आल्यास खचून न जाता नव्याने उभारी घ्या, असे म्हैसकर म्हणाले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर खेमराज हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदू नाईक, पर्यवेक्षक प्रमोद सावंत, सहशिक्षक सूर्यकांत सांगेलकर, रणवीर रणसिंग, रोट्रॅक्टचे अध्यक्ष रोहन कुबडे, सचिव मिताली सावंत, सहसचिव संकेत वेंगुर्लेकर, ओंकार पावसकर, दत्तराज चिंदरकर, मयूर मसूरकर, साहिल बांदेकर, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते. ईश्वरी कल्याणकर हिने सूत्रसंचालन केले. नेहा निगुडकर हिने आभार मानले.
....................
77050
शिष्यवृत्ती परीक्षेत दक्षेश जिल्ह्यात प्रथम
मुणगे, ता. ११ ः येथील श्री भगवती हायस्कूलचा आठवीतील विद्यार्थी दक्षेश मांजरेकर याने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळविली. त्याने ७४.६६ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल भगवती हायस्कूल व संस्थेच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शालेय समिती सदस्य संजय बांबुळकर, कार्यकारिणी सदस्य धर्माजी आडकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, सहाय्यक शिक्षिका गौरी तवटे, हरिदास महाले, प्रसाद बागवे, रश्मी कुमठेकर, नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर, सुविधा बोरकर, तेजल बागडे, मनोज मुणगेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.