शोभिवंत मत्स्यपालनासाठी मत्स्य महाविद्यालयाचे ४५ वर्षे योगदान
-rat१२p७.jpg-
P२५N७७०१७
रत्नागिरी : शोभिवंत मत्स्यशेतीतील उद्योजकता विकास राज्यस्तरीय कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना डॉ. अनिल पावसे.
---
शोभिवंत मत्स्यपालनातून आर्थिक उन्नती
डॉ. अनिल पावसे ः मत्स्यशेतीसाठी महाविद्यालयाची मदत
मत्स्य महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा---लोगो
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : शोभिवंत मत्स्यपालन या व्यवसायासाठी मत्स्य महाविद्यालयाला ४५ वर्षे मोलाचे योगदान आहे. शोभिवंत मासे आपल्या घराची शोभा वाढवतात, मानसिक ताण कमी करतात, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही करतात. त्यासाठीची शास्त्रशुद्ध माहिती, शेतकऱ्यांमधील शोभिवंत मत्स्यशेतीतील संवाद आणि व्यवसाय वाढीसाठी या महाविद्यालयातून सदैव मदत होईल, अशी ग्वाही मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी दिली.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त शिरगाव येथे मत्स्य महाविद्यालय आणि शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. राज्यातून २००हून अधिक मत्स्य शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी मंचावर केंद्रीय मत्स्यिकी शिक्षणसंस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ. माधुरी पाठक, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (मिरकरवाडा प्राधिकरण) अक्षया मयेकर, सागरी पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे मंगेश गावडे, मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य जीवशास्त्र आणि मत्स्य जलशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागरकर, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि मत्स्य विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण, हंस ॲक्वाकल्चरचे हसन म्हसलाई, रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेचे अध्यक्ष फहद जमादार, उपाध्यक्ष राकेश सावंत, सचिव अमित सुवारे उपस्थित होते.
शोभिवंत मत्स्यसंवर्धन सद्यःस्थिती आणि भविष्यातील संधीबाबत डॉ. माधुरी पाठक, रोग, निदानाविषयी डॉ. गजानन घोडे, संशोधन, विकासाविषयी डॉ. भरत यादव यांनी मार्गदर्शन केले. प्रकाशयोजनेविषयी योगेश मोडक, खाद्याचे विक्री व्यवस्थापनाविषयी मॅथ्यूज, शासकीय योजनेविषयी उत्कर्षा कीर यांनी बहुमोल माहिती दिली. शोभिवंत मत्स्य संवर्धकांची संशोधन आणि विकस अपेक्षेविषयीच्या गटचर्चेत श्रीराम हातवळणे, हसन म्हसलाई, मेहमूद सय्यद, किशोर सामंत, अल्बर्ट अमन्ना, फ्रान्सिस गोन्साल्विस, लॉर्ड्स फर्नांडिस, अमित देवरे, सचिन सुर्वे, स्वप्नील पेणकर, जावेद शेख आदींनी सहभाग घेतला.
चौकट १
पुरस्काराने सन्मान
शोभिवंत माशांच्या व्यवसायात अनेक वर्षे कार्यरत विस्पी मेस्त्री आणि श्रीराम हातवळणे यांना रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राजेश साळगांवकर, निशांत शिंदे व रूपाली मुकादम-कोळी यांना नवोदित शोभिवंत मत्स्यसंवर्धक पुरस्कार प्रदान केला. पारंपरिक सोबत आधुनिकतेची कास धरून सचोटीने व्यवसाय करणारे सुरेंद्र शिरधनकर, कल्पेश नाईक, अमित सुवारे, सुयोग भागवत, चंद्रकांत भालेकर, राहुल म्हात्रे, राजेश पाटील, राजेश सरनाईक, मंगेश पाटील, जगन पवार, गणेश इलेगटी, चेतन साळुंखे, हेमंत पाटील, मुबारक सुतार, सुहास सावंत, मॅथ्यू डिसिल्वा, फ्रान्सिस गोन्साल्विस, किशोर सामंत, तन्वीर सय्यद, लॉर्ड्स फर्नांडिस, अल्बर्ट अमन्ना आणि विद्या ठक्काय यांना सन्मानित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.