कळंबणी केंद्रात शिष्यवृत्तीत यश
कळंबणी केंद्राचे
शिष्यवृत्तीत यश
खेड ः शिष्यवृत्तीच्या पाचवीच्या परीक्षेत कळंबणी केंद्रातील ५ विद्यार्थ्यांची रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. शिरवली गुरव शाळेतील श्रेयश सुतार, नीरज साळुंखे, उधळे बुद्रुक शाळेतील पूर्वी कदम, उन्नती पवार तर वाळंजगाव शाळेतील आयुष जाधव या विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. वाळंजगाव शाळेतील आयुष जाधव व शिरवली गुरव शाळेतील श्रेयश सुतार या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
‘जगबुडी’जवळील
विसर्जन घाटाची दुरवस्था
खेड ः शहरातील जगबुडी नदीजवळील गणेश विसर्जन घाटाच्या दुसऱ्या बाजूला नव्याने गणेश विसर्जन घाट उभारण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विसर्जन घाटाच्या उभारणीचे काम सुरू असतानाही केवळ एक भिंतच उभारण्यात आली आहे. ही भिंतही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकली आहे. घाटाचे कामही अपूर्णावस्थेत असल्याने यंदाही गणेशभक्तांना नव्या घाटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवा गणेश विसर्जन घाट उभारण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला; मात्र दोन वर्षात उभारण्यात आलेली एक संरक्षक भिंत सद्यःस्थितीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकली आहे. नगरपालिकेने जगबुडी नदीकिनारी कचरा टाकण्यास मज्जाव केलेला असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे कचरा टाकला जात आहे.
संतोष शिंदेंना सर्वोत्कृष्ट
सचिव पुरस्कार
खेड ः खेड लायन्स क्लब सिटीचे तत्कालीन सचिव संतोष शिंदे यांनी कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सचिवपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लायन्स क्लबच्या माध्यमातून शिंदे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी असतात. गतवर्षी सचिवपदाची धुरा सोपवल्यानंतर केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोत्कृष्ट सचिव पुरस्काराने सन्मानित केले. उत्कृष्ट मदतनीस लायन्स म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला.
‘हेदली-सवेणी’मध्ये
शिक्षण परिषद
खेड ः तालुक्यातील हेदली- सवेणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये खोपी बीटस्तरीय शिक्षण परिषद गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी शिक्षणविस्तार अधिकारी वरेकर, केंद्रप्रमुख सदाशिव राठोड, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मनोज जाधव, कल्पेश दळवी, सुरेश सरमळकर, प्रवीण गुजर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.