कोकण
दापोली आगारातून गणेशोत्सवानंतरचे आरक्षण सुरू
दापोली आगारातून आरक्षण सुरू
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १२ : गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी दापोली आगार सज्ज झाले आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी जादा बसेसच्या संगणकीय आरक्षणाला ११ जुलैपासून प्रारंभ झाल्याची माहिती आगारप्रमुख राजेंद्र उबाळे यांनी दिली आहे.
दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, भाईंदर, विठ्ठलवाडी, पुणे या मार्गावर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसेसव्यतिरिक्त जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एसटीच्या प्रवासामध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ६५ वर्षावरील व महिला प्रवाशांना ५० टक्के दरात प्रवास या सुविधा उपलब्ध असून, मागणीनुसार दापोली तालुक्यातील विविध गावातून ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.