मालवण बौद्ध महासभेतर्फे वर्षावास प्रवचन मालिका
77083
मालवणात वर्षावास प्रवचन मालिका
बौद्ध महासभेतर्फे ७ आॅक्टोबरपर्यंत आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, मालवण यांच्यावतीने आषाढ पौर्णिमा १० जुलै ते आश्विन पौर्णिमा ७ ऑक्टोबरपर्यंत तालुक्यामधील गाव शाखांमध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यामध्ये २० जुलैला वराड येथे ‘भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत’ (विजय हरकुळकर), २६ ला धामापूर येथे ‘महाबोधी विहार व बौद्धांची पवित्र स्थळे’ (संजय पेंडूरकर), २ ऑगस्टला काळसे येथे ‘बौद्धांचे सण व मंगल दिन’ (शिवप्रसाद चौकेकर), ९ ला गोळवण येथे ‘महामंगल सुत्त’ (गौतम पळसबकर), १० ऑगस्टला वडाचापाटमध्ये ‘अनित्य, अनाथम व दुःख’ (शंकर कदम), मसदे येथे ‘अनित्य, अनाथम, दुःख’ (मिलिंद पवार), १५ ला चौके येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान’ (संग्राम कासले), १६ ला पेंडूर चरीवाडी येथे ‘बौद्ध धम्म आणि विज्ञान’ (योगेश वराडकर), २३ ला पेंडूर खरारे येथे ‘बौद्धांच्या आचारसंहिता’ (विश्वनाथ कदम), ३१ ला हिवाळे येथे ‘विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध’ (शंकर कदम), ६ सप्टेंबरला ओवळीये येथे ‘पराभव सूक्त- माणसाच्या पराभवाची कारणे’ (नचिकेत पवार), १३ सप्टेंबरला हेदूळमध्ये ‘बौद्ध धम्म आणि मानवता’ (शशिकांत पवार), १५ ला रामगड येथे ‘बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये’ (अमित पवार), १७ ला शिरवंडे येथे ‘सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य’ (प्रकाश पवार), २० ला राठिवडे येथे ‘कालामसूक्त’ (सूर्यकांत कदम), २७ ला कुणकवळेमध्ये ‘त्याग मूर्ती माता रमाई’ (नेहा काळसेकर), २८ ला तिरवडे येथे ‘बौद्ध धम्म आणि मानवता’ (शंकर कदम), २ ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती गतिमान कशी केली?’ (रविकांत कदम), ४ ऑक्टोबरला आचरा येथे ‘स्त्रियांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (प्रा. नंदू हेदूळकर), ७ ला चुनवरे येथे बौद्ध धम्म आणि मानवता (भगवान जाधव). ही वर्षावास प्रवचन मालिका सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. मालिकेसाठी सर्वांनी पांढऱ्या पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखाध्यक्ष रविकांत कदम व सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.