गोवळकोट किल्ला रिल्स स्पर्धेत वेदांत शितप प्रथम
- ratchl१२३.jpg ः
२५N७७०६३
चिपळूण ः रिल्स स्पर्धेत विजेते ठरलेले तरुण.
----
‘रिल्स स्पर्धेत’ वेदांत शितप प्रथम
गोवळकोट येथे आयोजन ; निखिल पवार द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः शहरातील गोवळकोट येथील गोविंदगडाच्या इतिहासाची ओळख व्हावी व गडाविषयी तरुणांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने राजे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रिल्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत वेदांत शितप हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. निखिल पवार याने द्वितीय आणि आतिश तांबे याने तृतीय क्रमांक पटकावला.
राजे सामाजिक प्रतिष्ठानचा अकरावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने गोविंदगड विषयावर आधारित आयोजित केलेल्या रिल्स स्पर्धेला शहर परिसरातील तरुणांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत यांनी आढावा घेतला. गोविंदगडाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रील स्पर्धेचे आयोजन केल्याचे नमूद केले. या स्पर्धेत २१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रतिष्ठानचे प्रतीक बुरटे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून गडाच्या ऐतिहासिकतेचा प्रभावी प्रचार करण्यात स्पर्धकांनी कल्पकतेचे दर्शन घडवले.
या वेळी चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, वैश्य नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष तुषार रेडीज, माजी केंद्रप्रमुख आखाडे, शिवाजी गोवळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.