नाकारलेला कचरा प्रकल्प कोत्रेवाडीतच कशाला हवा

नाकारलेला कचरा प्रकल्प कोत्रेवाडीतच कशाला हवा

Published on

...तरीही कोत्रेवाडीचा प्रस्ताव स्विकारला
कचरा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा सवाल ; रद्द केलेला प्रस्ताव योग्य कसा ठरवला
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १२ ः कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडसाठीची नियोजित जागा नियम २०१६च्या निकषानुसार योग्य नाही, असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनीच फेब्रुवारी २०२१ मध्ये लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. तरीही पुन्हा कोत्रेवाडी जागेचाच प्रस्ताव कसा स्वीकारला जातो, असा कोत्रेवाडी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
लांजा नगरपंचायतीचा कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीलगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे; मात्र हा प्रकल्प राबवताना शासकीय नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नाही. जवळच जलस्रोत आहेत. वाडी अवघ्या १८० ते २०० मीटरवर आहे आणि त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, कोत्रेवाडी येथील नियोजित जागा ही नियम २०१६ च्या निकषानुसार योग्य नाही, असे जिल्हा निवड समितीच्या अहवालावरून स्पष्ट होते. असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनीच फेब्रुवारी २०२१ मध्ये मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. मार्च २०२१ मध्ये जिल्हा निवड समितीने नाकारलेला कोत्रेवाडी येथील जागेचा प्रस्ताव रद्द केल्याचे पत्र नगरपंचायतीकडून ग्रामस्थांना देण्यात आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड जागेचे नगरपंचायतीने खरेदीखत केले होते. एकीकडे जिल्हा प्रशासन अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोत्रेवाडी येथील जागा ही निकषानुसार योग्य नाही, असे पत्र देतात आणि दुसरीकडे २०२४ मध्ये याच जागेची डम्पिंग ग्राउंडसाठी खरेदी केली जाते. त्यामुळे नगरपंचायतीला आचारसंहिता लागू होत नाही का? असा प्रश्न कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रस्ता नसेल, जलस्रोत असतील तर जागेचे खरेदीखत केलेच कसे, त्याचप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयाने या जागेतील तीन गटांच्या हद्दी खुणादेखील निश्चित केल्या नाहीत. डम्पिंगसाठी खरेदी केलेल्या जागेच्या जर हद्दी खुणांच निश्चित झालेल्या नसतील तर खरेदीखत केले कसे? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कोट
घनकचरा प्रकल्पाची जागा घेण्यामध्ये लांजा नगरपंचायतीच्या प्रशासनाने मोठा आर्थिक घोटाळा करून हा प्रकल्प कोत्रेवाडीच्या ग्रामस्थांच्या माथी मारला आहे.
-मंगेश आंबेकर, आंदोलनकर्ते, कोत्रेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com