खेड-कळंबणीत तिहेरी अपघातात तिघे जखमी

खेड-कळंबणीत तिहेरी अपघातात तिघे जखमी

Published on

-rat12p29.jpg, rat12p30.jpg
77118, 77119
खेड ः अपघातग्रस्त मोटार आणि रिक्षा.

कळंबणीत तिहेरी अपघातात तिघे जखमी
खेड, ता. १२ : तालुक्यातील कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोरच मोटार, दुचाकी आणि रिक्षा यांच्यात तिहेरी अपघात शनिवारी (ता. १२) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात रिक्षाचालक यशवंत पांडुरंग अदावडे (वय ५५, कळंबणी-गावडेवाडी, ता. खेड), रिक्षातील प्रवासी चुनिलाल देवलाल चौधरी (५४, भरणेनाका, खेड) आणि दुचाकीचालक यश मोरे (रा. खेड) हे जखमी झाले. त्यांच्यावर कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विकास कृष्णा गायकर (वय ४२, डोंबिवली-मुंबई, मूळ रा. वणंद गवळवाडी) हे मोटारने (एमएच ०५, सीएच २२३८) मुंबई ते दापोली असे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार (एमएच ०८, बीएफ ०७७०) यश मोरे याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटारीने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला (एमएच ०८, के ३७८३) धडक दिली. यात रिक्षाचालक यशवंत पांडुरंग अदावडे हे गंभीर जखमी झाले. तसेच चौधरी व मोरे हे सुद्धा जखमी झाले. या तिघांवरही कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com