रत्नागिरी पालिकेला मिळाले नवीन २० सफाई कामगार

रत्नागिरी पालिकेला मिळाले नवीन २० सफाई कामगार

Published on

रत्नागिरी पालिकेला मिळाले
नवीन २० सफाई कामगार
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागाला नवीन २० सफाई कर्मचार मिळणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना आज नियुक्त्तीपत्रे देण्यात आली.
आरोग्य विभागात काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी लाड पागे समिती नेमण्यात आली होती. या समितीने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २० सफाई कामगारांना सामावून घेतले जाणार आहे.
रत्नागिरी पालिकेकडे ८० स्थायी सफाई कामगार आहेत त्यात नव्या २० कामगारांची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता पूर्णक्षमतेने होऊ शकणार आहे. रत्नागिरी पालिकेच्या सभागृहात होणाऱ्या छोटेखानी कार्यक्रमावेळी नूतन सफाई कामगारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com