रत्नागिरी-जिल्ह्यात बसली १ लाख १८ हजार स्मार्ट मीटर
जिल्ह्यात बसली १ लाख १८ हजार स्मार्ट मीटर
एकीकडे विरोध कायम ; दुसरीकडे मीटर बदलण्याचे काम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : केंद्र शासनाने वीजबिलं थकवणाऱ्यांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर योजना महाराष्ट्रातही लागू केली आहे. वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना हे मीटर रिचार्ज करणे आवश्यक आहे. जेवढे रिचार्ज तेवढीच वीज वापरता येणार आहे. सध्या महावितरणकडून फिडर, उपकेंद्र, शासकीय कार्यालये, वितरणकडून नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ६ लाख २२ हजार ९५५ ग्राहकांपैकी आतापर्यंत १ लाख १८ हजार ८२० स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सर्व प्रकारच्या ग्राहकांचे जुने मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. ग्राहक तसेच वीज कर्मचारी संघटनांकडून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असला तरी ग्राहकांच्या माथ्यावर ही योजना लादली जाणारच आहे. स्मार्ट मीटरसाठी मोबाईलप्रमाणे ग्राहकांना कुठूनही रिजार्च करता येणार आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा ग्राहकांना उपलब्ध होईल. अखंडित वीज पुरवठ्यामुळे वापर कमी-अधिक करता येणार आहे. रिचार्ज संपले की, वीजपुरवठा आपोआप खंडित होणार आहे.
विजेची चोरी रोखण्यासाठी ग्राहकांना महावितरणने स्मार्टमीटर आणले आहेत. ते बसवण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ग्राहकांचे एकूण ६ लाख २२ हजार ९५५ वीजमीटर आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ लाख १८ हजार ८२० ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. केंद्र शासनाने देशभरात सर्वत्र जुने मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विद्युत कंपन्यांनी नेमलेल्या एजन्सीद्वारे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.
चौकट...
जिल्ह्यात बदलण्यात आलेले मीटर
फीडर - ३०७
उपकेंद्र- २९४१
उच्चदाब वाहिनी -१०४
शासकीय कार्यालये -४२२५
नादुरस्त मीटर - २१२७४
नेट मीटर -६४८
----------
एकूण १ लाख १८ हजार ८२०
---------------
चौकट
जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या
ग्राहक प्रकार संख्या
घरगुती ग्राहक - ५,४२,५६७
वाणिज्यिक ग्राहक - ४१,६६०
औद्योगिक ग्राहक - ५७६२
कृषिपंप - २०५९४
पथदीप - २१६८
सार्वजनिक पाणीपुरवठा - ३३२३
इतर- ६८६५
--------------------
एकूण - ६ लाख २२ हजार ९५५
चौकट...
काय आहे स्मार्ट मीटर
स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईल रिचार्जप्रमाणे रिचार्ज करावे लागणार आहेत. ते रिचार्ज असतील तरच वीजपुरवठा सुरू राहील. ग्राहक जितके पैसे भरतील तेवढीच वीज वापरता येणार आहे. विजेचा किती वापर झाला आहे याची माहिती ग्राहकांना मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. पैसे भरले तरच वीजपुरवठा सुरू होईल, अशी सुविधा प्रीपेड मीटरमध्ये उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.