रत्नागिरी- फाटक हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत सुयश
rat12p11.jpg-
77023
रत्नागिरी : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे फाटक हायस्कूलचे विद्यार्थी.
----------
फाटक हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
रत्नागिरी, ता. १२ : फाटक हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांनी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. जिल्हा गुणवत्ता यादीत मुमुक्षा वझे (२६२ गुण तिसरी), मेघना मलुष्टे (२५८, ६वी), गार्गी देवल (२५६ गुण, ९वी), स्पृहा भावे (२४६ गुण, २०वी), सुयश गराटे (२३८ गुण, २८वा), ध्रुव बुरोडंकर (२३४ गुण, ३६वा), मिहीर खाडिलकर (२३२ गुण, ४१वा), शुभ्रा आंबेकर (२२८ गुण, ४८वी), चैतन्य भालेकर (२२६ गुण, ५५वा), दुर्वा मुरूडकर (२२२ गुण, ६९वी), श्रीवेद सनगरे (२१० गुण, १००वा) आणि आराध्य महाडिक (२०६ गुण, ११०वा) यांनी यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्यासह प्रकाश कदम आणि गीताली शिवलकर यांनी मार्गदर्शन केले. जूनपासून नियमित जादा तासिका आणि पेपरसंच विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आले. याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, सचिव दिलीप भातडे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी केले.