रत्नागिरी- छत्रपती शिवरायांचा आदर्श विसरल्याने गुलामी
rat13p8.jpg-
77242
दापोली : सनातन संस्थतर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ बंधू-भगिनी.
छत्रपती शिवरायांचा आदर्श विसरल्याने गुलामी
विजयकुमार शिंदेः सनातन संस्थेतर्फे जिल्ह्यात चार ठिकाणी गुरुपौर्णिमा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : हिंदु धर्म संपवण्यासाठी मोगलांनी धर्मावर आघात केला, ब्रिटिशांनी गुलाम बनवले. दीडशे वर्षे यात आपण अडकलो याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला झालेले धर्माचे विस्मरण. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण विसरलो. संतांच्या वचनांची आपण आठवण ठेवली असती, तर धर्माला ग्लानी आली नसती, असे प्रतिपादन विजयकुमार शिंदे यांनी केले.
सनातन संस्थेतर्फे टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनीही मार्गदर्शन केले. त्यांचे कार्यक्रम दापोलीतील श्री प्रीतीवर्धन मंगल कार्यालय, चिपळूण येथील श्री स्वामी मंगल सभागृह, रत्नागिरीतील अंबर हॉल आणि लांजा येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय अशा चार ठिकाणी झाले. त्यात १५०० हिंदु बंधू-भगिनी, जिज्ञासू आणि साधकांनी भाग घेतला.
दापोली येथे झालेल्या कार्यक्रमात श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष रमेश कडू यांनी सांगितले की, आम्ही गावामध्ये धर्म शिक्षणाचे दोन वर्ग चालू केले आहेत. आपण धर्म जाणून घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्माचरणाचे महत्त्व जाणून धर्माचरण करण्याची आज आवश्यकता आहे. आपण स्वतः साधना करून इतरांना साधना करायला सांगितले पाहिजे.
याप्रसंगी दापोलीत हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक निरंजन चोडणकर यांनी मार्गदर्शन केले. सनातनच्या संत स्नेहलता शेट्ये आणि बाळकृष्ण बाईत उपस्थित होते. चिपळूण येथील कार्यक्रमात अविनाश महाराज म्हणाले, सनातन संस्थेच्या कार्यक्रमात प्राचीन संस्कृती, धर्म अनुभवायला मिळतो, डॉ. आठवले यांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्राची संकल्पना पुढे नेण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. येथे सनातन संस्थेच्या वतीने विनय पानवळकर यांनी मार्गदर्शन केले. लांजा येथील कार्यक्रमात ज्योतिषाचार्य सुनील जंगम, हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी यांनी मार्गदर्शन केले.
चौकट
हिंदु धर्मप्रेमींचा सत्कार
रत्नागिरीत अॅड. सचिन रेमणे, रमेश सुर्वे, दापोलीत येथील हिंदुराज मित्रमंडळाचे अध्यक्ष मयूर मोहिते, चिपळूण येथे गोरक्षक विक्रम जोशी, अक्षय करंजकर आणि राजाराम बागवे, लांजा येथे ताम्हाणे, पाचल येथील अॅड. चंद्रकांत कडू यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.