बांदा येथे शुक्रवारी
महारक्तदान शिबिर

बांदा येथे शुक्रवारी महारक्तदान शिबिर

Published on

बांदा येथे शुक्रवारी
महारक्तदान शिबिर
बांदा ः ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदातर्फे येथे शुक्रवारी (ता.१८) महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंडळाने याआधी सलग पाच वर्षे उत्स्फूर्त सहभागाने रक्तदान शिबिर यशस्वी केले असून यंदाचे आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ, महिला शेकडोच्या संख्येने या शिबिरात सहभागी होतात. १८ ला व्यापारी भुवन (विठ्ठल मंदिर शेजारी) बांदा येथे सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी व गोवा बांबोळी रुग्णालय रक्तपेढी रक्त संकलन करणार आहेत. सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर व अक्षय मयेकर यांनी केले आहे. या शिबिरात अवयवदान, देहदान याविषयी जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य नीलेश मोरजकर यांनी केले आहे.
-----------------
विमा भरपाईबाबत
गुरुवारी बैठक
सावंतवाडी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता.१७) मंत्रालयात आयोजित केली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने विभागस्तरीय तक्रार निवारण समिती, कोकण विभाग यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील दाखल केले आहे. अपीलावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. प्रधान सचिव (कृषी), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक १७ ला दुपारी सव्वाबाराला मंत्रालयातील दालन क्रमांक ५१२, पाचवा मजला येथे होईल. या बैठकीसाठी दीपक केसरकर (विधानसभा सदस्य), नीलेश राणे (विधानसभा सदस्य), कृषी आयुक्त (पुणे), सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे), समन्वयक (राज्यस्तरीय बँकर्स कमिटी), मुख्य सरव्यवस्थापक (नाबार्ड, मुंबई), तसेच शेतकरी प्रतिनिधी अण्णा केसरकर (माडखोल, ता. सावंतवाडी) आणि शरद चुरी (रा. झाराप, ता. कुडाळ) यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळण्याबाबत हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------
बाल कलाकारांसह
महिलांना आवाहन
सावंतवाडी ः व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या दर्जेदार नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवगणेश प्रॉडक्शन्स (सिंधुदुर्ग मुंबई) लवकरच एक नवीन नाट्यकृती घेऊन येत आहे. या नाटकासाठी संस्थेला १० ते १२ वर्षे वयोगटातील एक मुलगा आणि एक मुलगी अशा बालकलाकारांची तसेच ३० ते ३५ वयोगटातील महिला कलाकाराची आवश्यकता आहे. शिवगणेश प्रॉडक्शन्सने यापूर्वी ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, नरसिंह शिवराय आणि ती फुलराणी यांसारख्या यशस्वी नाटकांची निर्मिती केली आहे. आता ते एका नवीन विषयावर आधारित नाटक रंगभूमीवर सादर करणार आहेत. या नाटकासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या नाटकाचे प्रयोग मुंबई आणि पुणे येथे होणार आहेत. त्यामुळे इच्छुक कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com